शिल्पा शेट्टीवर ईडीची टांगती तलवार; राहतं घर खाली करण्याची दिली नोटीस

On: October 10, 2024 4:25 PM
Shilpa Shetty
---Advertisement---

Shilpa Shetty Raj Kundra In Trouble l बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबईतील जुहू भागात असलेल्या त्यांचा आलिशान बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली आहे. कथित क्रिप्टो ॲसेट पॉन्झी स्कीम प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्रीचा हा बंगला तसेच पवना तलावाजवळील फार्म हाऊस तात्पुरते जप्त केले आहे. आता या जोडप्याला नोटीस बजावण्यात आली असून त्यांना ती खाली करण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिशीला शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

10 दिवसांत बंगला आणि फार्म हाऊस खाली करा :

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. तसेच न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली असून आज (10 ऑक्टोबर) दुपारी ही या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.

शिल्पा आणि राज यांनी वकील प्रशांत पाटील यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 27 सप्टेंबर 2024 रोजी या जोडप्याला ईडीकडून निष्कासनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. या जोडप्याने त्याला ‘अर्थहीन, बेपर्वा आणि मनमानी’ म्हटले आहे. त्याने आपले घर आणि कुटुंबाच्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करावे अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. नोटीसमध्ये ईडीने मुंबईतील घर आणि पुण्यातील फार्म हाऊस 10 दिवसांत रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

Shilpa Shetty Raj Kundra In Trouble l ईडीला तपासात पूर्ण सहकार्य करा :

कथित पॉन्झी स्कीम प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 2018 पासून कारवाई सुरू आहे. ईडीने अमित भारद्वाज विरोधात गुन्हा दाखल केला तेव्हा दोघांचीही नावे या प्रकरणाशी जोडली गेली होती. या सेलिब्रिटी दाम्पत्याने इतर सहआरोपींसह बिटकॉइनच्या रूपाने 6 कोटींहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

न्यायालयात दिलेल्या अर्जात शिल्पा आणि राज यांनी ईडीला तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की 2018 ते 2024 दरम्यान ईडीने पाठवलेल्या सर्व समन्सला या जोडप्याने उत्तर दिले आहे.

News Title : Shilpa Shetty Raj Kundra In Trouble

महत्वाच्या बातम्या –

मंत्रिमंडळाने घेतले मोठे निर्णय! पाहा तुमच्या फायद्याचा निर्णय आहे का?

‘या’ कारणामुळे सलमान खानसह बिग बॉस 18 अडचणीत सापडणार?

रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणार?, राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

रतन टाटांच्या ‘या’ कारने घातला होता बाजारात धुमाकूळ; किंमत फक्त…

“रतन टाटा यांना भारतरत्न द्या”; कुणी केली मागणी?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now