Shilpa Shetty Raj Kundra Marriage | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच तिच्या फिटनेससाठी चर्चेत असते. मात्र यावेळी तिचा पती राज कुंद्राने त्यांच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. नुकताच तो भारत सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या शोमध्ये सहभागी झाला होता. या शोदरम्यान त्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. (Shilpa Shetty Raj Kundra Marriage)
पहिली भेट आणि प्रस्ताव :
राज कुंद्राने सांगितलं की, शिल्पाशी त्याची पहिली भेट दुबईत झाली. शिल्पाचा मॅनेजर हा त्याचा मित्र होता आणि याच ओळखीमुळे त्यांची भेट झाली.
त्यावेळी भारतात त्याचं काहीच नव्हतं – अगदी स्वतःचं घरसुद्धा नाही. नंतर त्याने शिल्पाला प्रपोज करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर फ्लॅट खरेदी केला. मात्र शिल्पाने होकार देण्यासाठी तब्बल दीड वर्ष वेळ घेतला.
Shilpa Shetty Raj Kundra Marriage | शिल्पाची लग्नाची अट :
शिल्पाने राजला स्पष्ट अट घातली होती की, काहीही झालं तरी ती भारत सोडणार नाही. तिला भारतातच राहायचं होतं आणि तिने हे ठामपणे सांगितलं. यावर राज कुंद्राने उत्तर दिलं – “लग्नानंतर आपण भारतातच राहू. तुला भारत सोडण्यासाठी कधीच दबाव आणणार नाही. फक्त फिरण्यासाठी परदेशी जाऊ.” (Shilpa Shetty Raj Kundra Marriage)
त्याच्या या शब्दांनंतरच शिल्पाने लग्नाला होकार दिला. राज म्हणतो की, “मी शिल्पावर खूप प्रेम करतो आणि तिच्या प्रत्येक गोष्टीचा आदर करतो.”
कौटुंबिक नातं आणि सध्याचं आयुष्य :
राज कुंद्रा सांगतो की त्याचे आई–वडील अजूनही देशातच असतात आणि ते नेहमीच दिवाळीसारख्या सणांना त्यांच्या घरी येतात. कामाबाबत तो म्हणतो की, “मी कुठेही बसून माझं काम करू शकतो, त्यामुळे भारतात राहणं माझ्यासाठी कधीच अडचण नव्हती.”






