पोलिसांनी अक्षयचा एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन; शर्मिला ठाकरे असं का म्हणाल्या?

On: September 25, 2024 4:50 PM
Sharmila Thackeray
---Advertisement---

Sharmila Thackeray l बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला आहे. या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या एनकाऊंटरवर विरोधकांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

शर्मिला ठाकरेंनी मांडली बेधडकपणे बाजू :

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला मारून तुम्हाला कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा सवाल विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे. मात्र आता या वादात शर्मिला ठाकरे यांनी देखील उडी घेतली आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाही तर मी एक महिला म्हणून बोलत आहे असे स्पष्ट करत त्यांनी त्यांची बाजू बेधडकपणे मांडली आहे.

यासंदर्भांत जर अक्षयचा पोलिसांनी एन्काऊंटर केला असेल तर पोलिसांचं खूप अभिनंदन आणि त्यांनी जाणून बुजून एन्काऊंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन असा आलेला एक मेसेज शर्मिला ठाकरे यांनी वाचून दाखवला आहे.

Sharmila Thackeray l तरच आरोपीना वचक बसेल :

यासंदर्भात कसाही एन्काऊंटर झाला असला तरी देखील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे हे देखील लक्षात घ्यायला हवं. जोपर्यंत कायद्याचा धाक होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे एन्काऊंटर झालेच पाहिजेत. तसेच पुरुषी बलात्कारी लोकांवर अशाने वचक नक्कीच बसेल.

तसेच मी सध्या कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाही आहे. मी एक महिला म्हणून बोलत आहे. तसेच मला स्वतःला देखील एक मुलगी आहे, मी महिलांच्या बाजूने बोलते आहे, आम्हा महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना देखील निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील सुरक्षिततेची भावना निर्माण करायची असेल तर अशा प्रकारचे एन्काऊंटर हे नक्कीच झालेच पाहिजेत अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.

News Title : Sharmila Thackeray On Badalapur Crime

महत्वाच्या बातम्या-

अरबाज पटेल पुन्हा बिग बॉसमध्ये झळकणार?

अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मोठा प्रश्न उपस्थित

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

गायिका नेहा कक्करचं लग्न मोडणार?, रोहनप्रीत सिंहपासून घेणार घटस्फोट?

‘या’ बड्या बँकेत झाला कोट्यवधीचा घोटाळा, तुमचं खातं तर नाही ना?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now