Shardiya Navratri 2025 | शारदीय नवरात्रीचा पवित्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना केली जाते. शास्त्रानुसार, या काळात नियम आणि शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी त्याचा वध केला. म्हणूनच मातृशक्तीची नऊ दिवस उपासना केली जाते. (Shardiya Navratri 2025)
नवरात्रीत टाळाव्यात अशा 5 गोष्टी :
नवरात्रीच्या काळात भक्तांनी काही गोष्टींपासून दूर राहावं, अशी परंपरा सांगितली आहे. असे केल्यास उपासनेचे पुण्य कमी होते आणि देवीचा आशीर्वादही लाभत नाही, अशी श्रद्धा आहे.
राग (Anger) :
नवरात्रीत राग टाळा. क्रोधामुळे मन अशांत होतं आणि साधनेत विघ्न येतं. देवीच्या आशीर्वादाचा लाभ घ्यायचा असेल तर संयम आणि शांततेने वागणं आवश्यक आहे.
अहंकार (Ego) :
अहंकार हा उपासनेचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. देवी दुर्गेच्या कृपेचा लाभ घ्यायचा असेल तर अहंकाराचा त्याग करून विनम्रतेने प्रार्थना केली पाहिजे.
लोभ (Greed) :
लोभामुळे माणसाच्या मनातील दोष वाढतात. लोभी व्यक्ती फक्त स्वतःचं हित पाहते आणि अशा व्यक्तीवर देवी प्रसन्न होत नाही, असे शास्त्रात सांगितले आहे.
खोटं बोलणं (Lying) :
खोटं बोलणं हे नवरात्रीत गंभीर पाप मानलं जातं. जे खोटं बोलून स्वतःचा फायदा साधतात त्यांना देवी दुर्गा कधीच आशीर्वाद देत नाही.
फसवणूक (Fraud) :
फसवणूक ही मानवी दोषांपैकी एक मोठी उणीव आहे. नवरात्री हा दोषांवर विजय मिळवण्याचा सण आहे. त्यामुळे इतरांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर देवीची कृपा राहत नाही, अशी मान्यता आहे.






