पराभवानंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘मी आता काय…’

On: November 24, 2024 6:15 PM
Sharad Pawar |
---Advertisement---

Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी काल दिवसभर भूमिका मांडली नाही. त्यामुळे शरद पवार काय बोलणार? याची उत्सुकता वाढली होती. अखेर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली भूमिका मांडली आहे. आमची जी अपेक्षा होती तसा निर्णय नाही, असं शरद पवार म्हणाले.

शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे, त्यावर भाष्य करत नाही. निर्णय लोकांनी दिला. त्याचा मी अभ्यास करेन. ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

असा निर्णय कधी आला नव्हता. आता आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं शोधणं, नक्की काय आहे समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहणं लोकांमध्ये जाऊन उभं राहणं. मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. मुद्दा तो नाही., अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होतो. हे बंद होईल याची चिंता महिलांना झाली. त्यामुळे या महिलाांनी आमच्या विरोधात मतदान केलं हे प्राथमिक दिसतं, असं शरद पवार म्हणाले. मी राज्यात सर्व जिल्ह्यात फिरलो. तिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचाही उमेदवार होता. आमचा उमेदवार होता तिथे इतर पक्षाचे कार्यकर्ते राबत होते. सर्वांनी कष्ट केले. पण निकाल आमच्या विरोधात गेला, असं शरद पवारांनी म्हटलंय.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर शरद पवार म्हणाले की “निकाल काल लागला मी आज कराडमध्ये आहे. हा असा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता मी काय घरी बसणार नाही”. 

महत्त्वाच्या बातम्या- 

“आयुष्यात छान गोष्ट घडली…”, प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत दिली गूड न्यूज

महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाची स्थापना होणार? कोण करणार

‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

महायुतीतील 6 नेत्यांना मिळणार विधानपरिषदेची संधी, कोणाला लागणार लॉटरी?

निकालानंतर ‘या’ मोठ्या पदावर अजित पवारांची नियुक्ती

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now