लिफ्टमध्ये शरद पवारांचा वळसे पाटलांना ‘इशारा’! मग सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवून दोघेच… नंतर काय घडलं?

On: May 9, 2025 5:20 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. साताऱ्यात झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील (DIlip walse Patil) यांच्यात गुप्त चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही चर्चा लिफ्टमध्ये झाली, जी अनेक चर्चांना उधाण देणारी ठरली आहे.

पद्मभूषण भाऊराव पाटील यांच्या ६६व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबातील पाच सदस्य उपस्थित होते. यामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह सरोजताई पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर संस्थेच्या बैठकीसाठी सर्वजण जवळच असलेल्या इमारतीकडे रवाना झाले.

लिफ्टमध्ये झाली दोघांची गुप्त भेट :

इमारतीच्या चौथ्या मजल्यावर बैठक होणार होती. सर्वजण वेळेनुसार पोहोचत होते. याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) लिफ्टकडे गेले, त्यांच्या सोबत दोन सुरक्षारक्षक होते. लिफ्टजवळ उभ्या असलेल्या दिलीप वळसे पाटील यांना पाहताच शरद पवारांनी लिफ्ट थांबवली आणि सुरक्षारक्षकांना बाहेर जाण्याचा इशारा केला. त्यानंतर वळसे पाटील यांना लिफ्टमध्ये बोलावलं. दोघे एकटेच चौथ्या मजल्यावर पोहोचले.

या क्षणिक पण महत्त्वाच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळात ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

Maharashtra | व्यासपीठावर मात्र कोणताही संवाद नाही :

विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार (Sharad Pawar) आणि दिलीप वळसे पाटील (DIlip Walse Patil) यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातही संवाद दिसून आला नाही. पवार गटातील सदस्य एकमेकांशी बोलत होते, तर वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत संवाद साधत होते.

या पार्श्वभूमीवर माध्यमांनी शरद पवार व अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची मुलाखत वाचली नसल्याचं सांगितलं, तर रोहित पवार यांनी कोणतीही अधिकृत बैठक झाली नसल्याचं स्पष्ट केलं.

News Title: Sharad Pawar’s Private Lift Talk with Dilip Walse Patil Sparks NCP Merger Buzz

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now