सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांनी उचललं सर्वात मोठं पाऊल; थेट…

On: January 6, 2025 2:34 PM
Sharad Pawar wrote letter to CM Devednra Fadanvis  
---Advertisement---

Sharad Pawar | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता महिना उलटत आहे. या प्रकरणात 6 आरोपींना अटक झाली असून आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी CID व SIT पथक नेमलं आहे. सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे देखील अडचणीत आले आहेत. यातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा मुंडे यांच्या अत्यंत जवळचा असल्याने मुंडे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला जातोय. इतकंच नाही तर, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील विरोधी पक्षाकडून केली जातेय. अशात या सर्व प्रकरणी आता राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्वाची भूमिका घेतली आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहीलं आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना असल्याचं नमूद करत संतोष देशमुख हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी देखील केली आहे.

बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी पत्रात करण्यात आलीये.

शरद पवार यांनी पत्रात काय म्हटलंय?

मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपच श्री. संतोष देशमुख याचे काही गुंडांनी अपहरण करून निघृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपीना आणि त्यामागील सुत्रधाराना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत. यासदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोशमोर्चा राज्यशासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. (Sharad Pawar)

फरार आरोपींना व त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली. सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्वश्री सदीप क्षीरसागर, प्रकाश सोळुंके , जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार श्री. बजरंग सोनावणे यांनीआपल्या भाषणातून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सुत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या ह्या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरीता प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भुमिका बजावीत आहेत.

“…यांना शासनामार्फत सुरक्षा देण्यात यावी”

सतोष देशमुख यांची माणूसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनाची पाळेमूळे खणून काढावीत, अशी देखील मागणी केली. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणाची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखीत लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या  सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपणास विनंती की, सदर घटने विरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जीवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावे, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रात म्हटलं आहे.

News Title :  Sharad Pawar wrote letter to CM Devednra Fadanvis  

महत्त्वाच्या बातम्या-

खंडणी ते हाफ मर्डर..; वाल्मिकसह सुदर्शन घुले व सांगळेही अट्टल गुन्हेगार, गुन्ह्यांची यादीच समोर

खळबळजनक! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

सरपंच हत्येप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, SIT मधून ‘त्या’ अधिकाऱ्यांना हटवलं

HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; जाणून घ्या लक्षणं

नववर्षात गुड न्यूज, लाडक्या बहीणींनो 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?

Join WhatsApp Group

Join Now