शरद पवारांची मोठी खेळी; ‘या’ जागेवर महायुतीच्या ‘नाकी नऊ’ आणणार

On: October 28, 2024 2:01 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील समीकरणं वारंवार बदलताना दिसत आहेत. अशातच पुण्यातील मावळ विधानसभा मतदार संघ हा उमेदवारीच्या जाफरवरून चांगलाच चर्चेत आला आहे. कारण मावळमध्ये बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बापू भेगडेंना शरद पवारांच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातील समीकरणं प्रचंड वेगानं बदलू लागली आहेत.

बापू भेगडेंना शरद पवारांच्या पक्षाने दिला पाठिंबा :

मावळ विधानसभा मतदारसंघात राजकीय वारे वेगानं बदलत आहेत. कारण आज बापू भेगडेंना शरद पवारांच्या पक्षाने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता अपक्ष लढणाऱ्या बापू भेगडे यांची ताकत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण मावळ विधानसभेच्या जागेसाठी प्रचंड रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार सुनील शेळकेंना उमेदवारी जाहीर करताच महायुतीमध्ये मोठा बॉम्ब फुटला आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री असलेल्या बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आणि त्यानंतर बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बापू भेगडेंना उपनाने पाठिंबा जाहीर केला आहे.

Sharad Pawar l भाजप पक्षाला मोठा धक्का :

सर्वात महत्वाचं बाब म्हणजे बापू भेगडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील आज जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता विद्यमान आमदार सुनील शेळकेंसमोर बापू भेगडे यांचं मोठं आव्हान असणार आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने मला दुःख झालं आहे. मात्र आता त्यामुळेच मी अपक्ष निवडणूक लढवतोय असं बापू भेगडे यांनी जाहीर केलं आहे.

अशातच आता दुसरीकडे मावळमध्ये भाजप पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. बाळासाहेब नेवाळे यांनी प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदाचा देखील राजीनामा दिला आहे. तसेच बाळासाहेब नेवाळे हे दूध संघाचे अध्यक्ष देखील होते. मात्र आता मावळमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याने मावळमध्ये विजयाचा झेंडा कोण फडकावणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News Title – Sharad Pawar support to bapu bhegde 

महत्त्वाच्या बातम्या-

युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक; नेमकं काय म्हणाले?

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरचे वडील ‘या’ भागातून निवडणूक लढवणार

एकही जागा न मिळाल्याने आठवले महायुतीत नाराज?, रिपाई स्वबळावर लढणार?

घरातील ‘या’ तीन वस्तू फेकून द्या; दिवाळीला होईल भरभराट

पुढील चार, पाच दिवस ‘या’ भागात पाऊस हजेरी लावणार!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now