Sharad Pawar l गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मराठा आरक्षण हे 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
… तर आम्हीही पाठिंबा देऊ :
मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार म्हणाले की, मराठा आरक्षण हे 50 टक्क्यांवरुन थेट 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, तसेच ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच यासाठी केंद्र सरकारने देखील पुढाकार घ्यावा, त्यावेळी आम्ही देखील पाठींबा देऊ असेही शरद पवार म्हणाले आहेत.
राज्यात मराठा आरक्षण मिळावे ही अनेक नागरिकांची भावना असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. याशिवाय इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची देखील काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. तसेच शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील टिका केली आहे. त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक थेट माझ्यावर बोलत आहेत, मात्र हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला आहे.
Sharad Pawar l वय वाढते तशी एनर्जी देखील वाढते :
शरद पवारांना प्रसारमाध्यमांनी एक प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला एवढी एनर्जी कुठून येते? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, जसे जसे माझं वय वाढते तस तशी माझी एनर्जी वाढते असं ते म्हणाले आहेत.
यावेळी शरद पवार यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याबबात देखील प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांना जे योग्य वाटते ते भले सरकारच्या विरोधात जरी असतील तरी ते बोलतात असं शरद पवार म्हणाले आहेत.
News Title – Sharad Pawar statement On Maratha Reservation
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस’ मराठी 5 चा विजेता?
सोनं खरेदी करावं की नाही?, दरवाढीचं सत्र सुरूच; जाणून घ्या आजचे दर
दिवाळी गिफ्ट! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या याचे काय फायदे मिळणार!
मोठी बातमी! शिंदे गटाच्या मंत्र्याचा भीषण अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक






