पायाला दुखापत असतानाही शरद पवार अनवाणी पायाने जोडे मारो आंदोलनात सहभागी!

On: September 1, 2024 2:05 PM
---Advertisement---

Sharad Pawar | मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे रविवारी राज्यभर आंदोलन केले. मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

शरद पवार अनवाणी पायाने आंदोलनात सहभागी

मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नसतानाही आज (1 सप्टेंबर) महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जमलेल्या आंदोलकांना संबोधित केलं यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

या मोर्चामध्ये महाविकास आघाडीमधील शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी प्रकृती बरी नसतानााही आंदोलनात सहभागी झाले. विशेष म्हणजे शरद पवार आज वयाच्या 84व्या वर्षी पायाला जखम असल्याने पट्ट्या असतानाही अनवाणी पायाने आंदोलनात सहभागी झाले.

शरद पवारांची महायुती सरकारवर टीका

वाऱ्यामुळे पुतळा पडला, असं सांगितलं जातं. गेटवेवर हा पुतळा गेली 50 वर्षांपासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे, असं सांगत शरद पवारांनी सरकारवर टीका केलीये.

अनेक ठिकाणी छत्रपती महाराजांचे पुतळे उभे आहेत, या परिसरात असलेला पुतळा गेली अनेक वर्षे देखील लोकांना प्रेरणा देत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात असे अनेक पुतळे आहेत, पण मालवणच्या भागात उभारलेला पुतळा हा भ्रष्टाचाराचा नमुना होता मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान आहे, असं शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले.

पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाला हा जनमानसांत पक्का समज आहे. हा शिवछत्रपतींचा अपमान आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान आहे. हा अपमान करण्याची भूमिका ज्यांनी घेतली, त्यांचा निषेध करण्यासाठी ही मोहिम होती, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्य- 

पुण्यात नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा, कारण ऐकून धक्का बसेल

लाडकी बहीण योजना बंद होणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

महायुतीत वादाची ठिणगी; ‘या’ बड्या नेत्याचा थेट अजित पवारांना दम

बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या पहिल्या पत्नीचा धक्कादायक खुलासा!

सगेसोयऱ्यांचा मुद्दा ‘या’ नेत्यामुळे रखडला?, जरांगे पाटलांनी घेतलं राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचं नाव?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now