“..तर मी स्वतः आंदोलनात उतरेल”; MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात

On: August 22, 2024 9:00 AM
Maharashtra
---Advertisement---

Sharad Pawar | मागील तीन दिवसांपासून पुण्यातील एमपीएससीचे विद्यार्थी शास्त्री रोडवर आंदोलन करत आहेत. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसची परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.(Sharad Pawar )

या मागण्या होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिकाच या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच आता शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्य सरकारला लवकरात लवकर या प्रश्नी तोडगा काढावा, असं आवाहन केलं आहे. तसंच, सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर मी देखील आंदोलनात सहभागी होईल, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

शरद पवार यांचं ट्वीट-

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असं ट्वीट शरद पवार (Sharad Pawar )यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी देखील दोनवेळा एमपीएससीने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली आहे. आता तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख जाहीर करताना त्या दिवशी इतर कोणत्या परीक्षा नियोजित आहेत की नाही हे पाहण्याची तसदीही न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे तीन दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. (Sharad Pawar )

News Title – Sharad Pawar On MPSC Protest Pune

महत्त्वाच्या बातम्या-

बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने शाळांबाबत घेतला मोठा निर्णय!

व्यवसायात भरभराट ते धनप्राप्तीचा योग, ‘या’ राशींचे येणार सोनेरी दिवस

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवलयं तर अशाप्रकारे ब्लॉक करा, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

पुढील काही दिवसात सोन्याच्या किंमतीत होणार प्रचंड वाढ; जाणून घ्या आजचे दर

Join WhatsApp Group

Join Now