निकालापूर्वीच शरद पवार ॲक्शन मोडवर; उमेदवारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना?

On: November 22, 2024 1:44 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar l विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत. यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या निकालानंतर राज्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता निकालापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

शरद पवार गटाच्या उमेदवारांना दिल्या सूचना :

विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा उमेदवारांना मार्गदर्शन केले आहे.

या बैठकीदरम्यान राज्यातील उमेदवारांना उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी शरद पवारांनी सर्व विजयी उमेदवारांना निकालानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, अशा सूचना दिल्या आहेत.

Sharad Pawar l दोन्ही घटक पक्षांचं सत्ता स्थापन करण्यावर लक्ष :

विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली आहे. मात्र यावेळी शरद पवारांनी महाविकास आघाडीला तब्बल 157 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही घटक पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करत आहेत.

यावेळी महायुती साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते देखील सक्रीय झाल्याची माहिती आहे.

News Title – Sharad Pawar give the special advice to candidate before assembly result

महत्त्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांनो… दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये पुन्हा बदल?

सत्ता स्थापनेबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; थेट म्हणाले..

भाजपकडून अपक्षांना ‘इतक्या’ कोटींची ऑफर?; राजकारणात खळबळ

विधानसभा निवडणुकीत विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांची यादी आली समोर!

कॉँग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ जागा येणार?, नाना पटोलेंनी CM पदाबाबतही केला मोठा दावा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now