आम्ही कुठेही पोरी देत नसतो; शरद पवार असं का म्हणाले?

On: October 7, 2024 3:05 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar l लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

हर्षवर्धन पाटलांनी तुतारी घेतली हाती :

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश हा शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी घेतली आहे.

मात्र आता इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. तुम्ही हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा. कारण मला निवडणूक लढायची नाही. मला तब्बल 14 वेळा निवडून दिलं आहे. त्यामुळे आता मला स्वतसाठी काही नको. आता मला राज्याचा चेहरा बदलायचा आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar l आम्ही कुठेही पोरी देत नसतो- शरद पवार :

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी इंदापूर येथे शरद पवार यांचं दणदणीत भाषण झालं आहे. यावेळी शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा देखील केली आहे. तसेच हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे जावई आहेत. त्यामुळे शरद पवारांनी केलेल्या भाषणात हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख थेट जावई असा केला आहे. याशिवाय आता त्यांना महाराष्ट्राचा देखील संसार नीट करण्याची ताकद असल्याचा हा जावई आहे असे म्हटले आहे.

तसेच राज्यातील काही लोक विचारत होते आता कसं होणार. त्यावेळी मी म्हटलं काही काळजी करू नका. शेवटी जावई कुणाचा आहे? तसेच काय आम्ही कुठेही पोरी देत नसतो. आम्ही चांगलं घर पाहूनच मुली देत असतो. कारण त्यांचा संसार नीट चालला पाहिजे. अगदी तसा महाराष्ट्राचा देखील संसार नीट करण्याची ताकद असल्याचा हा जावई आहे, हे बारामतीकरांनी तेव्हा पाहिलं होतं असं शरद पवार म्हणाले आहेत.

News Title – Sharad Pawar announced Candidacy to Harshvardhan Patil from Indapur

महत्त्वाच्या बातम्या-

अभिजीत गेम हरला, तरीही मिळाले सुरज पेक्षा जास्त पैसे; आकडा पाहून व्हाल थक्क

दसऱ्याला खरेदी करा ‘ही’ बाईक; जाणून घ्या किंमत

रियालिटी शो की, सिंपथी शो…?, सुरजच्या विजयानंतर अभिनेत्रीची पोस्ट

अजितदादांचा नवा डाव! बारामतीतून नाही तर ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढवणार

“मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, तेव्हा..”; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now