Shani Surya Pratiyuti Yog | वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:13 वाजता शनि आणि सूर्य ग्रह एकमेकांच्या 180 डिग्रीवर येणार आहेत. या संयोगामुळे प्रतियुति योग तयार होईल. ज्योतिषींच्या मते हा योग काही राशींना मोठा लाभ देणारा ठरणार आहे. विशेषतः सिंह, मकर आणि मीन राशींसाठी हा काळ सुवर्णकाळ मानला जात आहे.
सिंह राशी (Leo Horoscope) :
सिंह राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत लाभदायी आहे. शनी आठव्या चरणात आणि सूर्य दुसऱ्या चरणात असल्यामुळे आयुष्यातील संकटे दूर होण्याची शक्यता आहे. समाजात तुमचं स्थान उंचावेल आणि तुम्हाला आदर मिळेल. (Shani Surya Pratiyuti Yog)
नवीन शिकण्याच्या संधी उपलब्ध होतील, तसेच नेतृत्वगुण प्रकट होतील. व्यवसायात नवीन संधी आणि यशस्वी करार मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात देखील सकारात्मक बदल दिसून येतील.
Shani Surya Pratiyuti Yog | मकर राशी (Capricorn Horoscope) :
मकर राशीसाठी शनि-सूर्य प्रतियुति योग फार सकारात्मक मानला जातो. आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक समाधान लाभेल.
नोकरीत बॉसकडून कौतुक आणि बढतीची शक्यता निर्माण होईल. आर्थिक बाबतीत हा काळ लाभदायक ठरणार असून गुंतवणुकीतून दुप्पट फायदा मिळण्याचे संकेत आहेत. एकूणच, आर्थिक स्थैर्य वाढेल आणि कौटुंबिक आयुष्य आनंदी राहील.
मीन राशी (Pisces Horoscope) :
मीन राशीच्या जातकांसाठी प्रतियुति योग अत्यंत शुभ आहे. या काळात समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या कामातून चांगले परिणाम मिळतील. लग्न इच्छुकांसाठी शुभ विवाहयोग जुळण्याची शक्यता आहे.
जुनी संकटे संपून आयुष्यात नवीन उभारी येईल. मान-सन्मान, लोकप्रियता आणि समाधान या सर्व गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील.






