आज वर्षाच्या पहिल्या प्रदोषव्रताला राशीनुसार करा ‘हे’ उपाय; शनिदोष होईल दूर

On: January 11, 2025 8:30 AM
Shani Pradosh Vrat 2025
---Advertisement---

Shani Pradosh Vrat 2025 | शनी प्रदोष व्रत हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे व्रत असून ते शनी आणि प्रदोष काल ग्रहाच्या संयोगाने केले जाते. प्रदोष काल हा दिवस आणि रात्र यांच्या मिलनाचा काळ आहे, जो अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. आज 11 जानेवारीरोजी शनि प्रदोष व्रत केले जातील. वर्षाचे हे पहिले प्रदोष व्रत असणार आहे. आज शनिवार असल्याने त्याला शनी प्रदोष व्रत म्हटले आहे. या दिवशी पूजा केल्यास भगवान शिव तसेच शनिदेवाची कृपा प्राप्त होते. (Shani Pradosh Vrat 2025)

शनी प्रदोष व्रत पूजा मुहूर्त-

शनि प्रदोष व्रताची तिथी 11 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 21 मिनिटांनी सुरू होईल. तर 12 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी संपणार आहे. या दिवशी सायंकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल. पूजेचा हा शुभ मुहूर्त रात्री 8 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहील.

शनी प्रदोष व्रताची पूजा विधी-

प्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून शिवाची पूजा व उपवास करावा
संपूर्ण देवघराची स्वच्छता करावी
पूजेची सुरुवात गंगा जल अभिषेकाने करावी
शिवलिंगावर अक्षत, बेलपत्र, भांग, धोतऱ्याचे फुल, फुले, चंदन अर्पण करावे
धूप आणि दिवा लावून ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा
शनी प्रदोष व्रताची कथाही ऐकावी किंवा वाचावी
पूजेच्या शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिव्याने भगवान शंकराची आरती करावी. (Shani Pradosh Vrat 2025)

शनी प्रदोषच्या दिवशी राशीनुसार करा उपाय

मेष रास : शिवलिंगाची पूजा केल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. काळे तीळ, उडीद डाळ, इस्त्री, काळे कपडे दान करा .

वृषभ रास : या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पांढरे तीळ आणि गंगाजलचा अभिषेक करावा.

मिथुन रास : शनि प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवाची पूजा करा.

कर्क रास : शनि मंदिरात तेल दान करा. पूजा-पाठ करा (Shani Pradosh Vrat 2025)

सिंह रास : मोहरीच्या तेलाने मळलेली गोड भाकरी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला खायला द्या. शनि दोष दूर होईल.

कन्या रास : भगवान शंकराची पूजा केल्यानंतर कन्या राशीच्या लोकांनी शिव चालीसा आणि शिव पंचाक्षर मंत्राचा जप करावा.

तूळ रास : तूळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर 108 बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत.

वृश्चिक रास : भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवाचीही पूजा करावी. अन्नदानही करावे.

धनु रास : पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी आणि दूध अर्पण करावे आणि तेथे 5 मिठाई ठेवावी.

मकर रास : पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि 11 वेळा प्रदक्षिणा करावी. यावेळी तुमच्या राशीत शनीची साडे सातीही चालू आहे त्यामुळे शनि मंत्र ‘ओम शनि शनिश्चराय नमः’ चा 108 वेळा जप करा.

कुंभ रास : शिवलिंगासमोर बसून 11 वेळा शनि स्तोत्राचे पठण करावे. (Shani Pradosh Vrat 2025)

मीन रास : मोहरीचे तेल लावून कुत्र्याला भाकरी खायला द्यावी. अन्नदान केल्यास लाभ होईल आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

News Title : Shani Pradosh Vrat 2025

महत्वाच्या बातम्या –

आज शनिप्रदोष, ‘या’ राशींवर होणार थेट परिणाम; सतर्क राहावे अन्यथा…

पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यापासून ‘हे’ शेतकरी राहणार वंचित?

“पप्पा… आम्हाला माफ करा”, देशमुखांच्या लेकीने हंबरडा फोडला

मुन्नी मला घाबरत आहे?, सुरेश धस यांचा हल्लाबोल

‘अण्णा माझे दैवत…’ म्हणणारा बीडचा गोट्या गीते कोण?

Join WhatsApp Group

Join Now