Lucky Zodiac Signs | ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव यांना सर्वात प्रभावी व क्रूर ग्रह मानले जाते. प्रत्येक अडीच वर्षांनी ते राशी परिवर्तन करतात, तर दरवर्षी नक्षत्र परिवर्तन घडवून आणतात. सध्या शनीदेव मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत. आता ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९:४९ वाजता शनीदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हा नक्षत्र गुरु ग्रहाचा असल्याने या परिवर्तनाचे विशेष परिणाम दिसून येणार आहेत. दिवाळीच्या आधी घडणाऱ्या या बदलामुळे काही राशींचं भाग्य उजळणार असून त्यांना आर्थिक, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात लाभ मिळेल. (Shani nakshatra change 2025)
कर्क राशी :
कर्क राशीसाठी हे परिवर्तन अतिशय शुभकारक आहे. शनीदेव या राशीच्या नवव्या चरणात राहणार आहेत. त्यामुळे कामकाजात यश मिळेल, अडकलेली कामं पूर्ण होतील. नशिबाची साथ लाभल्यामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
Lucky Zodiac Signs | कुंभ राशी :
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. विशेषतः नोकरदार वर्गासाठी या काळात पदोन्नतीची आणि नवीन संधींची दारे उघडतील. उत्पन्नात वाढ होईल. व्यापार करणाऱ्यांना मोठे फायदे होतील. आर्थिक स्थिती मजबूत होण्यास सुरुवात होईल. (Shani nakshatra change 2025)
मीन राशी :
मीन राशीवर शनीदेव आधीपासून वक्री अवस्थेत असल्यामुळे अडथळे जाणवत होते. मात्र आता नक्षत्र परिवर्तनामुळे परिस्थितीत सुधारणा होईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. दीर्घकालीन गुंतवणूक आणि व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. करिअरमध्ये नवी दिशा मिळेल.






