नोव्हेंबर महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा; शनीदेव करणार मालामाल

On: November 9, 2024 9:28 AM
Shani Margi 2024
---Advertisement---

Shani Margi | कर्मफळदाता शनीदेव नोव्हेंबर महिन्यात काही राशींवर प्रसन्न राहणार आहे. शनीच्या चालीचा परिणाम हा जवळपास सर्वच 12 राशीवर होत असतो. या 15 नोव्हेंबरपासून शनी हा कुंभ राशीत मार्गी होईल. 15 नोव्हेंबरपासून 1 महिना शनी सरळ चालीत असल्यामुळे या काळात अनेक राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Shani Margi)

शनीला न्यायदेवता म्हटलं जातं. मान्यतेनुसार, शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. 15 नोव्हेंबर रोजी शनीच्या चालीत परिवर्तन होणार आहे. याचा अनेक राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा नोव्हेंबर महिना काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

‘या’ 3 राशींसाठी नोव्हेंबर महिना ठरणार भाग्याचा

मिथुन रास : या राशीच्या व्यक्तींचा दिवाळीनंतर सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसेल. तुमच्या बँक बॅलन्समध्येही वाढ होऊ शकते. तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तसेच यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या प्रत्येक कामाला कुटुंबियांचा पाठिंबा आणि साथ मिळेल. (Shani Margi )

मेष रास : या काळात शनीदेव तुमच्यावर विशेष आशीर्वाद ठेवतील. तुम्ही हातात घेतलेले सर्व काम मार्गी लागेल. तुम्हाला राजकारणात देखील मोठं यश मिळेल. तुम्हाला राजकारणात मोठं पद मिळेल. तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध आणखी चांगले होतील. तुम्हाला या काळात मोठा धनलाभ देखील होण्याची संभावना आहे. (Shani Margi )

कुंभ रास : या राशीच्या व्यक्तींना देखील शनीच्या चालीचा फायदा होणार आहे. या काळात तुमचं जीवन सुधारेल. यादरम्यान तुम्ही अनेक चांगली कामं कराल, तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. तुमच्या पगारात वाढ होईल. तुमचा नोकरीचा शोध देखील पूर्ण होईल. तुमची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड ठरेल. तुमचा विवाह योग देखील जुळून येईल. (Shani Margi )

News Title :  Shani Margi 2024 

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp Group

Join Now