Shani Gochar 2025 | वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मफळदाता शनी महाराज प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. यंदा दिवाळीचा सण २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा होणार आहे. त्याआधीच शनी महाराज नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. सध्या शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात विराजमान असून, ते ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्रवारी रात्री ९.४९ वाजता पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. शनीचा हा बदल २० जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे.
या संक्रमणामुळे काही राशींवर विशेष कृपा होणार असून, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक स्तरावर सकारात्मक बदल घडणार आहेत. विशेष म्हणजे या बदलामुळे मिथुन, तूळ आणि कुंभ या राशींना मोठा लाभ होणार आहे. (Shani Gochar 2025)
मिथुन रास (Gemini) : अडथळ्यांचा अंत, धनलाभाची संधी
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण अत्यंत लाभदायी ठरणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायाचा विस्तार होईल, तसेच जुन्या प्रलंबित कामांत गती येईल. शनी महाराजांच्या कृपेने अडथळे दूर होऊन आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.
Shani Gochar 2025 | तूळ रास (Libra) : प्रगतीचे नवे मार्ग खुलणार
तूळ राशीच्या लोकांना शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा मोठा फायदा होईल. केलेली गुंतवणूक फळाला येईल. आर्थिक आणि सामाजिक पातळीवर प्रतिष्ठा वाढेल. आपल्या कौशल्यामुळे आणि मेहनतीमुळे प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ असल्याने आत्मविश्वास वाढेल.
कुंभ रास (Aquarius) : नशिबाची साथ आणि आर्थिक सुधारणा
कुंभ राशीच्या व्यक्तींना या संक्रमणाचा सर्वाधिक फायदा होईल. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभदायी ठरेल. तुम्ही नियोजित कामे वेळेत पूर्ण करू शकाल. नशिबाची साथ मिळाल्याने करिअर आणि व्यवसायात स्थैर्य येईल.






