Shani 2024 | शनीच्या राशी बदलाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होतो. 3 ऑक्टोबर 2024 रोजी शनी राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. शनीच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम काही राशीवर होणार आहे. यावेळी शनि 27 डिसेंबर 2024 पर्यंत शतभिषा नक्षत्रात राहील. (Shani 2024)
शनि जवळपास 3 महिने राहूच्या नक्षत्रात राहणार आहे. हा काळ काही राशींसाठी लाभाचा ठरणार आहे. शनि नक्षत्र परिवर्तनामुळे 3 राशीच्या लोकांना डिसेंबरपर्यंत फायदाच फायदा मिळणार आहे. या राशीचे नशीब हे हिऱ्यासारखं चमकणार आहे. आता या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात.
नवरात्रीत ‘या’ 3 राशींचं नशीब उजळणार
मेष रास : या काळात तुमचे अडकलेले सगळे काम पूर्ण होईल. तुम्ही खूप काळापासून प्रतिक्षा करत असलेली गोष्ट पूर्ण होईल. नोकरीत तुम्हाला काही शुभवार्ता मिळू शकते, पैशाची आवक देखील चांगली राहील. तुमचा विवाहयोग देखील या काळात जुळून येईल. प्रेम विवाहसाठी तुम्हाला घरच्यांची साथ मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. (Shani 2024)
वृषभ रास : व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि जोडीदारासोबत तुम्ही सुखात राहाल. नवीन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. कुटुंबात सुरू असलेले वाद मिटतील, आपले पुन्हा एकत्र येतील. घरात धार्मिक कार्य घडेल. जवळच्या सर्व व्यक्तींची भेट होईल.अनपेक्षित स्रोतांतून पैसे येतील.
धनु रास : या राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलामुळे खूप फायदा होईल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत होता, त्यांचं लग्न या काळात निश्चित होऊ शकतं. धनलाभाचे संकेत आहेत. (Shani 2024)
News Title- Shani 2024 Nakshatra Parivartan
महत्वाच्या बातम्या-
बंगळुरूतील घटनेनं देशभर खळबळ, फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे 30 तुकडे
मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीराजे घेणार भेट
“आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी”
आज ‘या’ राशींवर राहणार महादेवाची कृपा; सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण!
MMS व्हिडीओनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ तूफान व्हायरल!






