Shaktipeeth Highway | नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Mahamarg) आराखड्यात अचानक बदल झाल्याच्या शक्यतेने सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या आराखड्यात नसलेली गावे आता भूसंपादनाच्या यादीत आल्याने आणि काही गावे वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
नवीन सर्वेक्षणाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता
प्रशासनाने सुरुवातीला जाहीर केलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Mahamarg) आराखड्यावर शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या होत्या. मात्र, आता नव्याने सुरू झालेल्या सर्वेक्षणामुळे आराखड्यात बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव आणि मिरज तालुक्यांतून हा महामार्ग जाणार आहे.
नवीन सर्वेक्षणानुसार, पूर्वीच्या आराखड्यात नसलेली काही गावे आता बाधित होणार आहेत, तर काही गावे वगळली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे, पण स्थानिक स्तरावर याबाबत कोणतीही अधिकृत सूचना नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Shaktipeeth Highway | पश्चिम भागातील गावांना जास्त फटका
शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Mahamarg) प्रस्तावित आराखड्यात मिरज (Miraj) तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांचा समावेश जास्त असल्याचे दिसते. या भागातील बहुतांश जमीन कृष्णा नदीकाठची (Krishna River) सुपीक आणि बागायती आहे. शिवाय हा भाग पूरग्रस्त क्षेत्रातही येतो.
महामार्ग झाल्यास या सुपीक जमिनी बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या बदलामुळे आरग, बेडग, खटाव, बिसूर, हरिपूर, कवठेपिरान, कर्नाळ, सांगलीवाडी आदी गावांना फटका बसणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीचे सदस्य सतीश साखळकर (Satish Sakhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांनी नव्याने सर्वेक्षण करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या विचारात घ्याव्यात, अशी मागणी केली आहे.






