एकनाथ शिंदेंच्या खुर्चीला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही; शिंदेंच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

On: December 13, 2024 2:49 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath shinde l विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.

शहाजीबापू पाटील नेमकं काय म्हणाले? :

भाजपच्या आमदारांच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. परंतू एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्चीवर आहेत याला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही. कारण आता ते जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते आहेत असं माजी आमदार शहाजीबापू म्हणाले आहेत.

याशिवाय विधानसभेला झालेल्या दारुण पराभवामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे आता त्यांना घराबाहेर पडून राजकारणात पुन्हा कसे यायचे यासाठी हा शोधलेला मार्ग म्हणजे ईव्हीएमवरती आक्षेप असल्याचा आरोप देखील माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

Eknath shinde l शहाजीबापूंनी संजय राऊतांवर केली टीका :

याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच खासदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोडून आणल्यावरच केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळणार अशी ऑफर भाजपने अजितदादांना दिल्याचा दावा देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.

मात्र आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शहाजीबापू पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हा संध्याकाळी वेगळं आणि दिवसा वेगळं स्वप्न पाहणारा माणूस आहे. जे स्वप्न संध्याकाळी पाहतो ते सकाळी टीव्ही समोर सांगण्याची सवय त्यांना आहे. तसेच अजितदादांना अशी भाजपने कोणतीही अट घातलेली नाही, हे मी खात्रीने सांगतो असं देखील शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

News Title – Shahajibapu Patil on DCM Eknath Shinde

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! ‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला अटक?

“आमदारांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवा, मंत्रीमंडळ विस्तारात…”; संजय राऊतांनी डिवचलं

फडणवीसांची लाडकी बहीण विधानपरिषदेवर; ‘या’ बहिणीला गिफ्ट मिळणार?

वर्ल्ड चॅम्पियन गुकेशची नेटवर्थ किती?, आकडा ऐकून चकित व्हाल

दत्त जयंती 14 की 15 डिसेंबरला; जाणून घ्या नेमकी कधी?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now