शिंदेंच्या OSD साठी शहाजीबापूंची फिल्डिंग, भाजपला दिली मोठी ऑफर

On: September 9, 2025 3:14 PM
Shahajibapu Patil
---Advertisement---

Shahajibapu Patil | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) डॉ. राहुल गेठे (Dr. Rahul Gethe) यांच्या संभाव्य आमदारकीसाठी शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. इतकेच नाही, तर आपल्या सांगोला (Sangola) मतदारसंघावर पाणी सोडून, डॉ. गेठे यांच्यासाठी त्यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपला (BJP) जागावाटपाची एक मोठी ऑफरही दिली आहे, ज्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. गेठे यांचा मतदारसंघातील वावर वाढला :

शहाजीबापू पाटील यांनी जाहीर केले आहे की, सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शिंदेंचे विश्वासू सहकारी आणि OSD डॉ. राहुल गेठे हेच आपले राजकीय वारसदार असतील.

मूळचे सांगोला भागातील असलेले डॉ. गेठे यांचा मतदारसंघातील वावर वाढला असून, त्यांच्या उमेदवारीसाठी स्वतः शहाजीबापूंनीच पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी आपला विद्यमान मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

Shahajibapu Patil | शिंदे गटाचा प्रभाव :

शहाजीबापू पाटील यांनी भाजपसमोर एक धाडसी प्रस्ताव ठेवला आहे. महायुतीमध्ये सांगोल्याची जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. या जागेवर डॉ. गेठे यांना उमेदवारी दिल्यास, आपण स्वतः माढा (Madha) लोकसभा किंवा माळशिरस (Malsiras) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, या दोन्ही जागा सध्या भाजपकडे आहेत. त्यामुळे, शिंदेंच्या OSD साठी मित्रपक्षाच्या जागेवरही दावा सांगण्याची तयारी दाखवून शहाजीबापूंनी मोठी राजकीय खेळी केली आहे.

सांगोला मतदारसंघ हा अनेक दशकांपासून शेतकरी कामगार पक्षाचा (PWP) बालेकिल्ला होता. २०१९ मध्ये शहाजीबापू पाटील यांनी येथून विजय मिळवत शिवसेनेला ही जागा जिंकून दिली होती. आता तीच जागा ते निकटवर्तीयासाठी सोडायला तयार झाल्याने, शिंदे गटाचा प्रभाव वाढवण्याचा हा एक मोठा प्रयत्न मानला जात आहे.

News title : Shahajibapu Patil Lobbies for Shinde’s OSD

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now