Shah rukh khan | सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये बॉलीवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खान हा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं.त्याने यावर्षी तब्बल 92 कोटी रुपये कर भरला आहे. तर, या यादीत दुसऱ्या क्रमांकावर साऊथ स्टार थलापति विजय आहे. विजयने 80 कोटी रुपये कर भरला आहे. तामिळ सिनेसृष्टीतील तो आघाडीचा अभिनेता आहे. (Shah rukh khan )
शाहरुख खानने भरला सर्वाधिक टॅक्स
या यादीत क्रिकेटपटू विराट कोहलीसह महेंद्रसिंह धोनीचे देखील नाव आहे. यादीमध्ये तिसऱ्या नंबरवर भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान आहे. त्याने 75 कोटी रुपयांचा कर भरला आहे. चार नंबरवर महानायक अमिताभ बच्चन आहेत. बीग-बी अमिताभ बच्चन नुकतेच ‘कल्की 2898’ या चित्रपटात दिसून आले. यातील त्यांची भूमिका खूप गाजली.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगला गल्ला कमवला. (Shah rukh khan )
अमिताभ बच्चन यांनी 2024 मध्ये 71 कोटींचा कर भरला आहे. तर, क्रिकेटपटू विराट कोहली याने 66 कोटी रुपये कर भरला आहे. विराट या यादीत पाचव्या नंबरवर आहे. या यादीत फक्त विराट कोहली, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचीच नावे टॉप 10 मध्ये दिसून आली.
View this post on Instagram
यादीतील टॉप 10 नावे-
महेंद्रसिंह धोनीने या वर्षात 38 कोटींचा कर भरला. तर, सचिन तेंडुलकरने 28 कोटी रुपये कर भरला.अभिनेता हृतिक रोशन 28 कोटी रुपयांच्या कर भरणासह या यादीत दहाव्या स्थानावर आहे. अभिनेता अजय देवगण याने देखील 42 कोटींचा कर भरला आहे.
या यादीत अभिनेता शाहरुख खानने (Shah rukh khan ) सर्वांना मागे टाकलं आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. येत्या काही वर्षात त्याचे एकापोठापाठ एक असे पाच ते सहा चित्रपट लाइनअप आहेत. ‘चक दे इंडिया 2’, ‘पँथर’, ‘इजहार’ आणि इतर काही चित्रपट त्याचे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
News Title – Shah rukh khan becomes highest tax payer
महत्त्वाच्या बातम्या-
“अरे मर्दांनो उठा, त्या ‘फिक्की’चा माज उतरवा..”; पुष्कर जोग निक्की तांबोळीवर भडकला
दुलिप ट्रॉफी स्पर्धेला सुरवात; जाणून घ्या स्पर्धेची A टू Z माहिती
गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट किंमती
आज ‘या’ 5 राशींवर राहील भगवान विष्णूची कृपा, धनसंपत्तीत होईल वाढ
सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार






