Mountaineers l अलिबागमधील (Alibag) अवघ्या सात वर्षांच्या शर्विका जितेन म्हात्रे (Sharvika Jiten Mhatre) हिने, प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात कठीण (Toughest) समजला जाणारा लिंगाणा दुर्ग (Lingana Fort) सर करून सर्वांनाच थक्क केले आहे. आत्तापर्यंत तिने तब्बल 121 गडांना (Forts) गवसणी घातली आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
सह्याद्रीच्या (Sahyadri) डोंगररांगेतील (Mountain Range) पुणे (Pune) आणि रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सीमेवर, दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग ‘स्वराज्याचे कारागृह’ (Prison of Swarajya) म्हणूनही ओळखला जातो.
या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाटदेखील अत्यंत धोकादायक (Thrilling) आहे. मात्र, या सर्व आव्हानांवर मात करत शर्विकाने ही मोहीम फत्ते केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबत 16 गिर्यारोहकांचाही (Mountaineers) समावेश होता.
Mountaineers l दोन वर्षांचे कठोर प्रशिक्षण आणि अनुभवी गिर्यारोहकांचे मार्गदर्शन :
या मोहिमेसाठी शर्विकाने एका संस्थेच्या माध्यमातून कन प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळेच तिला या मोहिमेत आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली. ही मोहीम आवश्यक सुरक्षा उपकरणांच्या (Safety Equipments) साहाय्याने यशस्वीपणे पार पडली.






