जय मल्हार फेम अभिनेत्याचा गंभीर अपघात

On: December 19, 2022 6:36 PM
---Advertisement---

मुंबई | झी मराठी(Zee Marathi) वाहिनी वरील ‘जय मल्हार'(Jai Malhar) या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांची अमाप पसंती मिळाली. या मालिकेतील कलाकारांनाही चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं. मालिकेत खंडेरायांची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेची(Devdatta Nage) चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

या मालिकेनंतर देवदत्त ‘डाॅक्टर डाॅन'(Doctor Don) या मालिकेत झळकला होता. या मालिकेतील त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सध्या तो कलर्स मराठी वरील ‘जीव माझा गुंतला'(Jeev Majha Guntala) या मालिकेत तुषार देसाई नावाच्या व्यक्तिरेखा साकारत आहे.

नुकतीच देवदत्तच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. जीव माझा गुंतला या मालिकेच्या शूटींगदरम्यान देवदत्तला दुखापत झाली आहे. त्याच्या डोळ्यालाही जखम झाली आहे. या दुखापतीमुळं देवदत्तनं काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

देवदत्तनं याबद्दल एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यानं अपघाताची माहिती दिली आहे. तसेच जीव माझा गुंतला या मालिकेतून काही काळ ब्रेक घेतला आहे, हेही सांगितलं आहे.

दरम्यान, देवदत्तनं ‘देवयानी’ या स्टार प्रवाहावरील मालिकेतून मराठी कलाक्षेत्रात पदार्पण केलं आहे. या मालिकेत त्यान सम्राट नावाची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now