आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात करण्याचा डाव होता?, कुणी केला दावा?

On: September 30, 2024 8:14 AM
Sensational claim about Eknath Shinde and Anand Dighe
---Advertisement---

Eknath Shinde | महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमकावले जात असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे. इतकंच नाही तर, शिंदे यांचा घात करण्याचा डाव देखील आखण्यात आल्याचा दावा या आमदाराने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे आमदार तथा सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी याबाबत दावा केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत हा दावा केलाय. एकनाथ शिंदे यांचाही स्वर्गीय आनंद दिघे यांच्याप्रमाणे घात करण्याचा कट आखण्यात आला होता, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय शिरसाट यांचा धक्कादायक दावा

एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या. त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, अशी शिफारस पोलिसांनी स्वत:हून केली होती. मात्र, फाईलवर सही करण्यात आली नाही. यातून एकच अर्थ समोर येत होता, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर उभे करणे, असा खुलासा संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय शिरसाट यांनी काल (29 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. त्यांनी आनंद दिघे यांच्याबाबत देखील एक धक्कादायक दावा केला आहे. “आनंद दिघे यांची हत्या झाली होती. ठाण्यातील सर्वांना याची माहिती आहे. त्यांचा अपघात झाला होता. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. त्यांचा रक्तदाब आणि शुगर व्यवस्थित होती. मग तरीही त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका कसा आला?”, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.(Eknath Shinde )

“..त्यांनीच आनंद दिघे यांचा काटा काढला असावा”

“शिवसेनेत आनंद दिघे यांना मोठ्या पदावर आणून बसवले तर गोची होईल, हे ज्या नेत्यांच्या लक्षात आले होते, त्यांनीच आनंद दिघे यांचा काटा काढला असावा. आपल्यापेक्षा कुणी मोठं होऊ नये, अशी रणनीती आखणारे व्यक्ती त्या पक्षात आहेत.”, असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या खुलाशाने खळबळ उडाली आहे. राजकारणात याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. (Eknath Shinde )

News Title :  Sensational claim about Eknath Shinde and Anand Dighe

महत्वाच्या बातम्या –

आज सोमवारी, महादेव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार?, वाचा राशीभविष्य

मोठी बातमी! आमदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला

एमसी स्टॅनबाबत धक्कादायक बातमी समोर, ‘त्या’ पोस्टने एकच खळबळ

लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, पाहा तिसरा हप्ता आला की नाही?

‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस, अचानक धनलाभ होऊ शकतो

Join WhatsApp Group

Join Now