शिवाजी कर्डीेलेंना नक्की काय झालं होतं?, महत्त्वाची माहिती आली समोर

On: October 17, 2025 2:27 PM
shivajirao kardile
---Advertisement---

Shivajirao Kardile |  राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व, भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने केवळ कर्डिले कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

हृदयविकाराचा तीव्र झटका ठरला जीवघेणा-

आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी गुरुवारी दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे सांगण्यात आले.

कर्डिले हे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे (District Cooperative Central Bank) अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत होते. नुकतेच ते एका मोठ्या आजारपणातून बरे झाले होते आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. तथापि, लोकांमध्ये सहज मिसळण्याच्या आपल्या स्वभावामुळे ते पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये पूर्णपणे सक्रिय झाले होते.

पंडित प्रदीप मिश्रांची भेट ठरली अखेरची-

निधनापूर्वी रात्री उशिरापर्यंत ते एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिर्डी (Shirdi) जवळील अस्तगाव येथे विखे पाटील (Vikhe Patil) जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिव महापुराण कथेच्या समारोपानंतर, साधारणतः पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास, ते लोणी (Loni) येथील विखे पाटलांच्या निवासस्थानी प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा (Pandit Pradeep Mishra) यांच्या दर्शनासाठी पोहोचले होते.

यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली दिसत होती, आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) स्वतः त्यांचा हात धरून त्यांना पायऱ्या उतरण्यास मदत करत होते. हे दृश्य अनेकांसाठी अस्वस्थ करणारे ठरले. हीच त्यांची सार्वजनिक जीवनातील अखेरची उपस्थिती ठरली. याप्रसंगी भाजप आणि शिवसेनेचे इतर अनेक आमदारही उपस्थित होते.

News Title – Senior BJP MLA Shivajirao Kardile Dies

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now