‘सीमा, तुला…’; पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरच्या पहिल्या नवऱ्याची थेट धमकी

On: April 25, 2025 3:40 PM
Seema Haider
---Advertisement---

Pahalgam | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानी (Pakistani) नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देताच, सीमा हैदरचा (Seema Haider) पहिला पती गुलाम हैदर (Ghulam Haider) याचा एक धमकीवजा व्हिडीओ समोर आला आहे. यात त्याने सीमा, तिचा भारतीय पती सचिन मीणा (Sachin Meena) आणि वकील एपी सिंह (AP Singh) यांना लक्ष्य केले आहे.

गुलाम हैदरची धमकी

पाकिस्तानातून (Pakistan) जारी केलेल्या व्हिडीओमध्ये गुलाम हैदर (Ghulam Haider) म्हणतो, “सीमाचे पाय आता भीतीने थरथर कापत आहेत. तिला वाटत असेल मी थकलो, पण मी माझ्या चार मुलांसाठी लढत राहीन.” त्याने सचिन मीणावर (Sachin Meena) अत्यंत आक्षेपार्ह टीका करत “ते काळं वांगं सचिन किती दिवस जगेल?” असा सवाल केला.

“आता निर्णयाची वेळ आली आहे. त्यांना कर्माचे फळ मिळेल. एपी सिंह (AP Singh) सुद्धा वाचवू शकणार नाही. सीमा, तुला यावेच लागेल,” असा इशारा गुलामने (Ghulam Haider) दिला आहे. त्याने व्हिडिओत थेट पहलगाम (Pahalgam) हल्ल्याचा उल्लेख केला नसला तरी, सरकारच्या आदेशानंतर सीमालाही परत पाठवले जाईल, अशी आशा त्याला वाटत असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सीमा भारतातच राहणार?

दुसरीकडे, सीमा हैदरचे (Seema Haider) वकील एपी सिंह (AP Singh) यांनी गुलाम हैदरचे (Ghulam Haider) दावे फेटाळले आहेत. ते म्हणाले, “सीमा पहलगाम (Pahalgam) हल्ल्याने दुःखी असून सध्या रुग्णालयात आहे. तिने नेपाळमध्येच (Nepal) सनातन धर्म स्वीकारला होता आणि सचिनशी (Sachin Meena) हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे.”

“सीमाची सर्व कागदपत्रे एटीएस (ATS), गृह मंत्रालय (Home Ministry) आणि भारत सरकारकडे (Government of India) जमा असून, तिची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. ती जामिनाच्या सर्व अटींचे पालन करत राबुपुरा (Rabupura) येथील घरी राहत आहे. तिचा कायद्यावर विश्वास असून ती उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकार आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत राहील,” असे एपी सिंह (AP Singh) यांनी स्पष्ट केले. सीमाने नुकतेच सचिनपासून  झालेल्या एका मुलीला जन्म दिला आहे.

Title : Seema Haider’s Ex Threatens Her Post-Pahalgam Fallout

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now