“मी भारताची सून, मला पाकिस्तानात परत जायचं…”; सीमा हैदरचा व्हिडिओ तूफान व्हायरल!

On: April 26, 2025 10:35 PM
Seema Haider Appeals Modi and Yogi to Stay in India
---Advertisement---

Seema Haider | पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांवर कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सीमा हैदर (Seema Haider) चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती भारतात राहण्याची विनंती करत आहे.

सीमा हैदरचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. या निर्णयामुळे भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार आहे. या परिस्थितीत, पाकिस्तानमधून प्रेमासाठी भारतात आलेली सीमा हैदरचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओत सीमा पती सचिनसोबत (Sachin) दिसते आणि ती म्हणते, “मला पाकिस्तानला परत जायचं नाही. मी भारतात आहे, मी भारताची सून आहे.” तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे भारतात  रहाण्याची विनंती केली आहे.

हा व्हिडिओ seema____sachin10 या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून यावर प्रचंड कमेंट्स आणि लाईक्स मिळाले आहेत. काही युजर्सनी सीमाच्या बाजूने समर्थन दर्शवले तर काहींनी विरोध केला. सीमा हैदरने 2023 मध्ये भारतात प्रवेश केला होता.

सीमा हैदरचे प्रकरण पुन्हा चर्चेत

सीमा हैदरचे वकिल एपी सिंह (A. P. Singh) यांनी स्पष्ट केलं आहे की सीमाचे प्रकरण अन्य पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळे आहे. सीमाचे सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय (Home Ministry) आणि एटीएसकडे (ATS) जमा आहेत. तसेच तिची याचिका राष्ट्रपतींकडे (President of India) प्रलंबित आहे. वकिलाने सांगितले की सीमाला उत्तर प्रदेशातील कोर्टाकडून जामीन मिळालेला आहे आणि ती सर्व कायदेशीर नियमांचे पालन करत आहे.

याचबरोबर वकिलाने असा दावा केला आहे की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. याबाबत वेळोवेळी तक्रारीही दाखल केल्या आहेत. एपी सिंह यांनी असेही म्हटले आहे की, सीमा सध्या भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या आश्रयावर राहत आहे आणि तिला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.

पहिला पती गुलाम हैदरची प्रतिक्रिया

दरम्यान, सीमाचा पहिला पती गुलाम हैदर (Ghulam Haider) याचा देखील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो सीमाला पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी करत आहे. त्याने असेही म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने सीमाला आणि मुलांना पाकिस्तानात परत पाठवावे किंवा तिच्यावर तिथेच शिक्षा करावी. त्याने सीमा हैदरच्या वकिलावरही टीका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Sachin (@seema____sachin10)

Title : Seema Haider Appeals Modi and Yogi to Stay in India

 

Join WhatsApp Group

Join Now