Health Tips | वाढती ऑफिस संस्कृती, तासनतास एका जागी बसून काम, आणि फक्त मोबाईल-टीव्हीवरील करमणूक ही आधुनिक जीवनशैली तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरत आहे. कारण तज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणतात, “बैठी जीवनशैली म्हणजे आजच्या काळातला ‘नवा साइलेंट किलर’ आहे.” (Health Tips)
हृदयविकाराचा धोका ३४% ने वाढतो! :
जागतिक स्तरावर केलेल्या अभ्यासानुसार, जे लोक दररोज ८ तासांहून अधिक वेळ बसून राहतात आणि कोणतीही शारीरिक हालचाल करत नाहीत, त्यांना हृदयविकार, मधुमेह व कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या जास्त असतो. 2024 मध्ये तैवानमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, सतत बसणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकारामुळे (Heartattack) मृत्यू होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत ३४ टक्के अधिक होता. (Sitting for Long Hours in Office Work It Affects Your Health)
बैठ्या जीवनशैलीमुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते, साखरेचं नियंत्रण बिघडतं आणि कोलेस्ट्रॉलचा समतोलही ढासळतो. परिणामी, धमन्यांमध्ये प्लाक जमा होतो आणि हृदयविकाराचं प्रमाण वाढतं.
Health Tips | दर ३० मिनिटांनी हालचाल अनिवार्य! :
तज्ज्ञांनी सांगितले की, प्रत्येक २०-३० मिनिटांनी २ मिनिटं चालणं, थोडं स्ट्रेचिंग करणं यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. वॉकिंग मिटिंग्स, सक्रिय प्रवास, किंवा ‘सीट-स्टँड’ वर्कस्टेशन्स यामुळे या धोक्यांना आळा घालता येतो. (Health Tips)
त्यांच्या मते, दररोज किमान ६० ते ७५ मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम आवश्यक आहे. पण जर उरलेला दिवस पूर्णपणे बसून गेला, तर व्यायामाचाही उपयोग कमी होतो.






