School Wall Collapses | गुजरातमधील वडोदरा येथील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया रोड परिसरात असलेल्या नारायण शाळेच्या पहिल्या मजल्यावरील (School Wall Collapses ) लॉबीचा काही भाग आणि भिंत कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
या दुर्घटनेत एक मुलगा जखमी झाला आहे. तर इमारतीच्या खाली ठेवलेल्या काही सायकल्सची मोडतोड झाली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे घडला धक्कादायक प्रकार
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येतंय की, लंचब्रेक सुरू असताना शाळेतील खोलीत काही विद्यार्थी जेवण करत होते. तर काही गप्पा मारत होते. सगळे जण आप-आपल्या धुंदीत असताना अचानक शाळेची लॉबी आणि भिंतीचा काही भाग कोसळतो.
कडेला बसलेले विद्यार्थी क्षणात यामुळे खाली कोसळतात. या घटनेमुळे (School Wall Collapses ) पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेत आतापर्यंत 6 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुजरात के वडोदरा में एक निजी स्कूल की दीवार गिरने से आधा दर्जन बच्चों को चोट लग गई। ये हादसा लंच ब्रेक के दौरान हुआ।
हर स्कूल को चलाने के लिए हर साल बिल्डिंग का सेफ़्टी सर्टिफिकेट लेना होता है।
क्या इस स्कूल का सेफ्टी सर्टिफिकेट लिया गया था? pic.twitter.com/Cy60TsD42q— Abhijit Raj (@AbhijitRajINC) July 20, 2024
घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची ही इमारत 14 ते 15 वर्षे जुनी असल्याची माहिती समोर येत आहे.
शाळेच्या व्यवस्थापनास इमारत जुनी असल्याचे माहिती असूनही (School Wall Collapses ) कोणतीही कारवाई केलेली नसल्याचं देखील म्हटलं जातंय. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
News Title : School Wall Collapses in Gujarat
महत्त्वाच्या बातम्या-
“UPSC सारख्या प्रक्रियेत गडबड म्हटल्यावर..”; पूजा खेडकर प्रकरणी प्रियंका गांधी संतापल्या
मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून मोठी माहिती समोर
अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान
विधानसभेपूर्वीच अजितदादांना धक्का?, ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट
गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, चांदीचाही मोठा दिलासा






