SBI Recruitment 2025 | सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये कोणतीही परीक्षा न देता थेट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीमुळे तरुणांसाठी स्थिर करिअर, आकर्षक पगार आणि प्रतिष्ठेचं पद मिळवण्याची उत्तम संधी आहे. (SBI Recruitment 2025)
SBI कडून जाहीर झालेल्या या भरतीअंतर्गत उमेदवारांची निवड डेप्युटी मॅनेजर (Economist) पदासाठी केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असल्यास त्यांनी त्वरित अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. (SBI Recruitment 2025)
परीक्षेशिवाय निवड प्रक्रिया, कमी स्पर्धेत मिळवा प्रतिष्ठित पद :
या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे परीक्षेशिवाय निवड प्रक्रिया होणार आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, वैयक्तिक मुलाखत आणि मेरिट लिस्टच्या आधारे केली जाईल. त्यामुळे लेखी परीक्षेची टप्पा टळल्याने पात्र उमेदवारांसाठी कमी स्पर्धेत ही उत्तम संधी ठरू शकते.
SBI च्या माहितीनुसार, ही भरती MMGS-II ग्रेडसाठी असून एकूण 3 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या प्रतिष्ठित पदासाठी आपली संधी निश्चित करावी.
SBI Recruitment 2025 | पगार, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया :
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹64,820 ते ₹93,960 इतका आकर्षक पगार मिळणार आहे. याशिवाय SBI च्या नियमांनुसार भत्ते, मेडिकल सुविधा आणि इतर शासकीय लाभ देखील दिले जाणार आहेत. त्यामुळे ही नोकरी केवळ स्थिर नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. (SBI Recruitment 2025)
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इकोनॉमिक्समध्ये मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच इकोनॉमेट्रिक्स, मॅथेमॅटिकल इकोनॉमिक्स किंवा फायनान्शियल इकोनॉमिक्स या विषयात पदवी घेतलेल्या उमेदवारांनाही पात्रता आहे. अर्जदाराचे कमाल वय 30 वर्षांपर्यंत असावे. (State Bank of India Jobs)
SBI मध्ये अर्ज कसा कराल? :
उमेदवारांनी SBI च्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर “Careers” विभागात जाऊन “Recruitment of Specialist Cadre Officer on Regular Basis” या लिंकवर क्लिक करावे. नवीन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करून लॉग-इन करावे आणि वैयक्तिक माहिती अचूकपणे भरावी.
अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट आपल्या जवळ ठेवावी. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2025 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये.






