Bank Alert l देशातील सर्वात मोठ्या आणि नामांकित अशा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) च्या करोडो खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने SBI खातेदारांना सतर्क केले आहे.कारण एसबीआयच्या करोडो खातेधारकांना फसवणुकीचा धोका आहे. गेल्या काही दिवसांपासून SBI ग्राहकांची खाती हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या खात्यातून बनावट मेसेजद्वारे पैसे काढले जात आहेत. याबाबत सरकारने इशारा दिला आहे.
SBI खातेधारक धोक्यात :
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या करोडो खातेदारांना फसवणुकीचा धोका आहे, त्या संदर्भात सरकारने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. सरकारने जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये एसबीआयच्या नावाने येणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहावे, असे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली SBI खातेधारकांची फसवणूक होत आहे. लोकांना ईमेल आणि मेसेजच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंट्सचे आमिष दाखवून तसेच सोशल मीडियावर फिरत असलेल्या फसवणुकीच्या मेसेजद्वारे सायबर फसवणुकीला बळी पडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Bank Alert l तुमचे SBI मध्ये बँक खाते असेल तर या मेसेजपासून दूर राहा :
वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने फिरत आहे. ज्यामध्ये SBI नेटबँकिंग रिवॉर्ड पॉइंट 9980 रुपये असल्याचे सांगितले आहे. मेसेजमध्ये, लोकांना हा रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी APK फाइल अपलोड करण्यास सांगितले जात आहे. हे मेसेज एसएमएस, ईमेल, व्हॉट्सॲपद्वारे लोकांना पाठवले जात आहेत.
मात्र SBI च्या ग्राहकांनी लक्षात घ्या की, हे मेसेज बनावट आहेत. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज बनावट असल्याचे घोषित करण्यात आले आहे. एसबीआयने असेही म्हटले आहे की ते कधीही आपल्या ग्राहकांना एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे कोणतीही लिंक पाठवत नाही. नागरिकांना बँकेकडून व सरकारकडून APK फाईल डाउनलोड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
News Title : SBI Fraud Message Viral
महत्त्वाच्या बातम्या-
अलर्ट! येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यांत वाढणार पावसाचा जोर
12 पैकी ‘या’ 2 राशींवर महादेवाची कृपा राहणार
“नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा
राज्यातील 20 धरणे तुडुंब भरली; ‘या’ गावांना सावधानतेचा इशारा
रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे!






