राज्यातील विद्यार्थीनींच्या शिष्यवृत्तीमध्ये केली मोठी वाढ; किती रुपये मिळणार?

On: October 5, 2024 11:42 AM
Maratha Scholarship Stop
---Advertisement---

Scholarship Scheme l राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रक्कमेत राज्य सरकारने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील मुलींना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

सरकारने शिष्यवृत्तीमध्ये केली वाढ:

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तीन पटीने वाढ केली आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती ही राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येत असते.

याशिवाय इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 60 रुपये वरुन 250 प्रतिमहा अशी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय विभाभज , विमाप्र आणि इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी 9वी आणि 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणारी 100 रुपयांची रक्कम वाढवून ती रक्कम 300 रुपये प्रतिमहा अशी वाढ केली आहे.

Scholarship Scheme l शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? :

राज्यातील विद्यार्थ्यांनींना प्रश्न पडला असेल की? सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभकसा घ्यायचा तसेच यासाठी नेमकं काय करावं? तर विद्यार्थ्यांनींनो सदर शिष्यवत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागणार आहे.

याशिवाय आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. तसेच राज्य सरकारने राबवलेल्या या शिष्यवृत्तीमुळं शिक्षण प्रभावामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाणे देखील कमी होण्यास मदत होत आहे.

News Title – Savitribai Fule scholarship scheme

महत्त्वाच्या बातम्या-

बिग बॉसच्या घरात अरबाजची एन्ट्री; निक्की म्हणाली…

बोपदेव घाटातील गँगरेप प्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ CCTV फूटेजने खळबळ

महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! मोदींची मुंबईत तर राहूल गांधींची कोल्हापुरात तोफ धडाडणार

गुड न्यूज! राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 4000 रुपये

सुख-समृद्धीने जीवन फुलेल, देवी चंद्रघंटा आज ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now