Savali Bar Controversy | मुंबईतील सावली बार प्रकरणाने राज्यात राजकीय खळबळ उडवली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर चालणाऱ्या या बारविरोधात गंभीर आरोप होत असतानाच, पोलिसांनी बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द केली आहे. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे.
ऑर्केस्ट्रामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी मान्यता रद्द केली असून, बारमधील जेवण व मद्यसेवा पुढील दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, बारचा गुमास्ता परवाना, अन्न-औषध परवाना आणि मद्य विक्री परवाना अद्याप रद्द झालेला नाही. त्यामुळे बारच्या पूर्ण बंदीची प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली नाही. (Savali Bar Controversy)
परवानगी परत, परबांचा घणाघात :
उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “राज्यातील पोलीस प्रशासनावर दबाव आणून कारवाई थांबवली जात आहे,” असा आरोप करत त्यांनी कांदिवलीतील समतानगर पोलीस ठाण्याची भेट घेतली. तसेच वेळेवर कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाऊ असा इशाराही दिला.
या दबावानंतरच रामदास कदम यांनी सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत घेतल्याची माहिती समोर आली. परब यांच्या आरोपांनंतर पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली असून, पुढील कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे या वादाला आता आणखी वेग मिळाला आहे.
Savali Bar Controversy | “मुख्यमंत्री हतबल”; राजीनाम्याची मागणी कायम :
या प्रकरणावर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. “चोर चोरी करून गेला तरी त्याच्यावर कारवाई होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे,” असं परब म्हणाले. “मंत्री पदावर असताना काय हवं ते करण्याचा माज आहे,” अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. (Savali Bar Controversy)
त्यांनी योगेश कदम, माणिकराव कोकाटे आणि संजय शिरसाट यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष या राजकीय वादाकडे लागले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.






