सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं, इतक्या लाखांची दिली सुपारी

On: December 11, 2024 5:23 PM
Pune News
---Advertisement---

Pune Crime l सध्या पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अशातच 9 डिसेंबर रोजी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भर चौकातून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली.

पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती :

याप्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान एकाच दिवसांत 450 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. अखेर या तपासात पोलिसांना देखील मोठं यश आलं आहे. यावेळी पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे.
तसेच सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती आता पोलीस तपासातून उघड झाली आहे.

याशिवाय शेजारी राहणाऱ्या इसमाने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी तब्ब्ल 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटेनाबाबत सर्वात मोठा खुलासा केला आहे.

Pune Crime l चारही आरोपींवर कठोर गुन्हे दाखल :

सतीश वाघ यांच्या घराशेजारील व्यक्तीने वैयक्तिक वादातून त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सुपारी देणाऱ्या शेजाऱ्याला व्यक्तीला देखील अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील चारही आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

News Title : Satish Wagh Murder Case Update

महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! पत्नीच्या छळाला कंटाळून २४ पानांचे पत्र लिहीत AI इंजिनिअरने संपवलं जिवन

पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र; काय आहे कारण?

BJP आमदाराच्या मामाच्या हत्ये संदर्भात धक्कादायक माहिती समोर

“…तरच डिसेंबरचा हप्ता मिळणार”; लाडक्या बहीणींनो अर्जाला ‘ही’ कागदपत्रे जोडली तर होती ना?

विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार? नार्वेकरांनी दिली माहिती

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now