भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण, नंतर हत्या! नेमकं काय घडलं

On: December 10, 2024 11:30 AM
Pune Crime
---Advertisement---

Pune Crime l सध्या पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अशातच काल पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भर चौकातून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सतिश वाघ असं अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीच नाव आहे.

नेमकं काय घडलं? :

यासंदर्भात हडपसर पोलिसांनी या घटनेचा कसून शोध घेतला. यावेळी पुण्यात विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

सोमवारी (9 डिसें) सकाळी सतिश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मात्र पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. परंतु, पोलिसांना सतिश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. पुण्यापासून 37 किलोमीटर लांब असलेल्या शिंदवणे घाटात सतिश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे.

Pune Crime l हत्या नेमकी कशी झाली? :

मृत सतिश वाघ यांचा मृतदेह सापडल्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नेमकी हत्या कशी झाली याची प्राथमिक माहिती दिली आहे. तसेच यासंदर्भात पुण्याचे पोलीस उपायुक्त ए राजा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, सतीश वाघ यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याशिवाय अपहरणानंतर सकाळीच सतीश वाघ यांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज उपायुक्तांनी व्यक्त केला आहे.

News Title : Satish Wagh Murder Case Update

महत्वाच्या बातम्या –

ब्रेक फेल की… कुर्ल्यातील अपघातामागचं खरं कारण काय?

राजकीय वर्तुळात शोक, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं निधन

“लाडक्या तायांनो, आता रस्त्यावर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून स्वतःचं रक्षण…”; किरण माने यांची पोस्ट

महायुतीत कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?, संभाव्य यादी समोर

मुंबई हादरली! कुर्ल्यात मृत्यूतांडव, भरधाव बेस्टने समोर दिसेल त्याला चिरडलं, नेमकं काय घडलं?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now