अखेर सतीश वाघ हत्येमागचा मास्टरमाइंड समोर! …अत्यंत जवळच्या व्यक्तीनेचं काढला काटा

On: December 26, 2024 2:52 PM
Satish Wagh Murder
---Advertisement---

Satish Wagh Case l पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सतीश वाघ यांची हत्या करण्यामागील मास्टरमाइंड त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ होत्या, हे पोलीस तपासातून उघड झाले आहे. मात्र आता सतीश वाघ यांच्या हत्येमागचं धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे.

मोहिनी वाघ यांनी पोलिसांसमोर केलं रडण्याचं नाटक :

9 डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचे अपहरण ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर झाले होते. चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं. ही अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली होती. मात्र अपहरणाच्या दिवशीचं रात्री शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांच्यावर चाकूने तब्बल 72 वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

सतीश वाघ यांच्या हत्येनंतर मोहिनी वाघ यांनी पोलिसांसमोर रडण्याचं नाटक केलं होतं. मात्र, पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या पतीच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात मोहिनी वाघ यांनी आपल्या पतीच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे.

Satish Wagh Case l मोहिनी वाघ यांनी पतीची हत्या का केली? :

मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हे संबंध जवळपास 11 वर्षे चालले होते. सतीश वाघ यांना या प्रेमसंबंधांचा सुगावा लागल्यानंतर ते मोहिनी वाघ यांना सातत्याने मारहाण करायचे. यामुळे मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्या अनैतिक संबंधात अडथळे येत होते. अक्षय जावळकर याच्या मनात सतीश वाघ यांच्याबद्दल प्रचंड राग होता, त्यामुळेच त्यानी सतीश वाघ यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

तसेच या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अक्षय जावळकर, पवन शर्मा, नवनाथ गुरसाले आणि विकास शिंदे यांचा समावेश होता. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मोहिनी वाघ यांनीच या हत्येची सुपारी दिली होती. त्यामुळे मोहिनी वाघ यांना पोलीस क्राइम ब्रांचने अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

News Title : satish wagh murder case mohini wagh arrested

महत्वाच्या बातम्या –

संतोष देशमुख प्रकरणी सुरेश धसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

पुण्यातील ‘या’ भागात मद्यधुंद कारचालकाचा हैदोस! तब्बल ‘इतक्या’ वाहनांना दिली धडक

सिनेमालाही लाजवेल असं हत्याकांड, सतीश वाघ हत्याप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

शेतकऱ्यांनो ‘या’ दिवशी PM किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणार?

बीडचं वातावरण तापणार! वाल्मिक कराडसह 4 बड्या नेत्यांची नावे समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now