“…म्हणून मी त्या महिलेला पैसे “; दिशा सालियानच्या वडिलांनी जबाबात सगळं सांगितलं

On: April 3, 2025 4:26 PM
Disha Salian
---Advertisement---

Satish Salian | सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियान (Satish Salian) यांचा जबाब समोर आला असून, त्यामध्ये त्यांनी काही खासगी आर्थिक व्यवहारांबाबत खुलासा केला आहे. त्यांच्या जबाबाची माहिती मालवणी पोलिसांसह एसआयटीकडेही देण्यात आली होती आणि त्यात त्यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या महिलेला पैसे देत असल्याचं कबूल केलं आहे.

मित्राच्या माध्यमातून पैसे-

सतीश सालियान (Satish Salian) यांनी आपल्या जबाबात स्पष्ट केलं की, लॉकडाऊन काळात त्यांचा आणि त्यांच्या मित्राचा लोणचं बनवण्याचा एक व्यवसाय सुरू होता. मात्र त्या काळात त्यांच्या मित्राचं निधन झालं आणि त्याच्या पत्नीला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे त्यांनी माणुसकीच्या नात्याने त्या महिलेला किराणा खर्चासाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला. हे पैसे त्यांनी थेट न देता, एका मित्राच्या माध्यमातून दिले.

दिशाच्या लॅपटॉपवर सतीश सालियान यांचे व्हॉट्सअप मेसेज सिंक झाले होते, त्यामुळे ती ही सर्व माहिती बघू शकत होती. तिला वाटत होतं की वडील अजूनही त्या महिलेला पैसे देत आहेत. याच कारणामुळे वडिलांनी स्वतःच्या खात्यातून पैसे देणं थांबवलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या परिस्थितीमुळे दोघांमध्ये वाद झाला आणि नात्यात तणाव निर्माण झाला.

कोविड काळात आर्थिक अडचण-

दिशाच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी, म्हणजे 2 जून 2020 रोजी, तिने वडिलांना (Satish Salian)  त्या पैशांबाबत जाब विचारला होता. त्या दिवशी झालेल्या वादानंतर 4 जून रोजी दिशाने घर सोडलं आणि मालाड (Malad) येथील मालवणी परिसरात गेली, अशी माहिती तिच्या मित्रांनी पोलिसांना दिली. सतीश सालियान यांनी सांगितले की, त्यांनी त्या महिलेला तीन हजार रुपये दिले होते आणि हे पैसे एका मित्राकडून पाठवले होते. त्याचा स्क्रीनशॉट त्यांनी मित्राकडून मिळवला होता, जो पुढे दिशाच्या लॅपटॉपवर दिसला.

ही घटना दिशा आणि तिच्या वडिलांमधील संवाद तुटण्याचं कारण ठरली. कोविड काळातील आर्थिक अडचणी असूनही वडिलांनी इतर महिलेला मदत केल्याने दिशा नाराज होती, असं सूत्रांकडून समजते. आता, या सर्व घडामोडींनंतर सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दिशाची आत्महत्या नसून तिची बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

या याचिकेत (Aditya Thackeray), (Suraj Pancholi) आणि (Dino Morea) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, सखोल चौकशीची मागणी सतीश सालियान यांनी केली आहे. दिशा सालियनच्या मृत्यूला पाच वर्षे उलटल्यानंतर त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

News  Title – satish salian reveals what happened exactly

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now