‘लग्नाला नकार दिला म्हणून ती…’; महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी खळबळजनक दावा समोर

On: October 26, 2025 2:19 PM
Sampada Munde Case
---Advertisement---

Satara Suicide Case | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील डॉक्टर संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांच्या आत्महत्येप्रकरणी आता दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. या प्रकरणाला रोज नवे वळण मिळत असून, आरोपी प्रशांत बनकरच्या (Prashant Bankar) कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यांनी आणि पोलिसांच्या तपासातील नव्या शक्यतेने खळबळ उडाली आहे.

दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (PSI Gopal Badne) याच्यावर बलात्काराचा आणि प्रशांत बनकरवर शारीरिक व मानसिक छळाचा आरोप केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली असून, त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुसरा मुख्य आरोपी, निलंबित पीएसआय गोपाळ बदने, जो फरार होता, तो देखील शनिवारी रात्री उशिरा स्वतःहून पोलिसांसमोर शरण आला. पोलिसांनी रात्री त्याची सुमारे एक तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज, रविवारी, बदनेला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल अशी अपेक्षा आहे.

Satara Suicide Case | एकतर्फी प्रेम की छळ? तपासाला नवी दिशा

या प्रकरणात आता एक नवीन अँगल समोर आला आहे. आरोपी प्रशांत बनकरच्या बहीण आणि भावाने दावा केला आहे की, डॉ. संपदा मुंडे या गेल्या वर्षभरापासून त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या आणि त्या प्रशांतला सतत फोन करून त्रास देत होत्या. इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रशांतला लग्नासाठी प्रपोज केले होते, पण त्याने नकार दिला होता, असा खळबळजनक दावा बनकरच्या बहिणीने केला आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही या प्रकरणात एकतर्फी भावनिक संबंधांची शक्यता वर्तवली आहे. चिठ्ठीतील नावांव्यतिरिक्त, तांत्रिक पुराव्यांची (व्हॉट्सॲप मेसेज, कॉल रेकॉर्ड्स) तपासणी केली जात असून, त्यातून वेगळी माहिती समोर येऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे, डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत, तिला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याची मागणीही जोर धरत आहे.

News Title- Satara Suicide Case, Both Accused Arrested

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now