Prashant Bankar | सातारा (Satara) जिल्ह्यातील महिला डॉक्टर संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी प्रशांत बनकरच्या (Prashant Bankar) बहिणीने समोर येत धक्कादायक दावे केले आहेत. मृत डॉक्टर तणावात होत्या आणि त्यांनीच माझ्या भावाला प्रपोज केले होते, पण त्याने नकार दिला, असा दावा तिने केला आहे. या नव्या माहितीमुळे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
मैत्री, तणाव आणि प्रपोजचा दावा
प्रशांत बनकरच्या (Prashant Bankar) बहिणीने सांगितले की, डॉ. संपदा मुंडे (Dr Sampada Munde) सुमारे वर्षभरापासून त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होत्या. काही काळ एकत्र राहिल्याने त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. “मी त्यांना तुमचा सरकारी जॉब चांगला आहे असे म्हणायचे, पण त्या नेहमी कामात खूप तणाव असल्याचे सांगायच्या आणि तणावातच दिसायच्या,” असे बहिणीने सांगितले.
याच महिन्यात प्रशांत आठ दिवसांसाठी घरी आला असताना, त्याची आणि डॉ. मुंडे यांची ओळख झाली. त्या प्रशांतला ‘दादा’ म्हणायच्या. प्रशांत पुण्याला परत गेल्यानंतर, डॉ. मुंडे यांनी त्याला प्रपोज केले होते, असा खळबळजनक दावा बहिणीने केला आहे. मात्र, प्रशांतने त्यांना कुटुंबातील सदस्य मानत असल्याचे सांगत त्यांचा प्रस्ताव नाकारला होता, असेही तिने स्पष्ट केले.
Prashant Bankar | छळाच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह
प्रशांत बनकरच्या बहिणीने छळाच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर माझा भाऊ छळ करत होता, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर आणि त्यांचे आई-वडील आमच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी याबाबत काहीच का सांगितले नाही?” असा सवाल तिने विचारला आहे. दुसरीकडे, प्रशांतच्या भावाने आरोप केला आहे की, भाऊ पोलिसांना सापडत नाही म्हणून पोलिसांनी त्याला आणि वडिलांना पोलीस ठाण्यात विनाकारण थांबवून ठेवले होते.
या नवीन दाव्यांमुळे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. पोलिसांनी यापूर्वीच प्रशांत बनकरला अटक केली असून, दुसरा आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) अद्याप फरार आहे. आता या नव्या अँगलचा पोलीस कसा तपास लावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






