महिला डॉक्टरच्या ‘त्या’ हातावरील मेसेजमुळे झाला खळबळजनक खुलासा!

On: October 24, 2025 4:23 PM
Dr. Sampada Munde Case
---Advertisement---

Satara Female Doctor Death | साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येपूर्वी या डॉक्टरने आपल्या तळहातावर सात ओळींचा संदेश लिहिला होता. या संदेशातील मजकुराने पोलिस विभागासह आरोग्य यंत्रणेतील जबाबदारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या तळहातावरील ओळींमध्ये दोन व्यक्तींवर बलात्कार आणि मानसिक छळाचे आरोप आहेत, ज्यामुळे संपूर्ण राज्यभरात संताप उसळला आहे.

आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. संपदा मुंडे असे असून त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. 23 ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. त्यांच्या तळहातावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ आहे, ज्याने माझा चार वेळा रेप केला आणि प्रशांत बनकर (prashant bankar) ज्याने मागील चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला.” या विधानानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

आत्महत्येपूर्वीचा खळबळजनक संदेश आणि तपासाची दिशा :

डॉ. मुंडे यांच्या तळहातावर सात ओळींच्या या संदेशात एक ठिकाणी खाडाखोड केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी आपला संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत लिहून दाखवला, असा भावनिक सूर अनेकांकडून व्यक्त होत आहे. या संदेशात बलात्काराचा थेट उल्लेख असल्याने प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांना फोन करून माहिती घेतली आहे. त्यांनी संबंधित PSI गोपाल बदने याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, दुसरा आरोपी प्रशांत बनकरविरोधातही कठोर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Satara Female Doctor Death | विरोधकांचा संताप आणि महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न :

या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. “एका महिला डॉक्टरला आत्महत्येचा मार्ग का निवडावा लागतो?” असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही असुरक्षिततेची भावना पसरली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून, पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर अधिक तपशील समोर येतील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. समाजाच्या सर्व स्तरातून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

News Title: Satara Female Doctor Death: “He raped me four times” — shocking message written on doctor’s palm before death

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now