डॉक्टर तरूणी ‘त्या’ रात्री हॉटेलवर का गेली?; तपासातून महत्त्वाची माहिती समोर

On: October 26, 2025 11:10 AM
Phaltan Doctor Death
---Advertisement---

Phaltan Doctor Death | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील डॉक्टर संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासात आता महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आत्महत्येपूर्वी नेमके काय घडले होते आणि डॉ. मुंडे यांनी हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, यावर प्रकाश पडला आहे. दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.

वाद आणि घराबाहेर पडण्याचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) या आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याच्या घरातील वरच्या मजल्यावर भाडेकरू म्हणून राहत होत्या. आत्महत्येच्या दिवशी, गुरुवारी, डॉ. मुंडे आणि प्रशांत बनकर यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर प्रशांतने त्यांना ‘तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही,’ असे सांगितल्याची माहिती समोर आहे.

या वादानंतर डॉ. मुंडे यांना त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटला कुलूप लावलेले आढळले. ऐनवेळी कुठे जायचे, हा प्रश्न उभा राहिल्याने आणि मानसिक तणावात असल्याने त्यांनी जवळच्या मधुदीप हॉटेलमध्ये (Madhudeep Hotel) राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गुरुवारी पहाटे दीड वाजता हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी रूम बुक केली होती. हॉटेलमध्ये चेक-इन करण्यापूर्वी आणि त्यानंतरही त्यांनी पीएसआय गोपाल बदने (PSI Gopal Badne) आणि प्रशांत बनकर यांना अनेकदा कॉल केल्याची माहितीही समोर आली आहे.

Phaltan Doctor Death | आरोपी अटकेत, कुटुंबीयांचे वेगळेच दावे

गुरुवारी दिवसभर डॉ. मुंडे यांनी रूमचा दरवाजा न उघडल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा उघडला असता, डॉ. मुंडे यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. त्यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय बदनेवर बलात्काराचा आणि बनकरवर शारीरिक व मानसिक छळाचा आरोप होता.

शनिवारी पहाटे पोलिसांनी प्रशांत बनकरला पुण्यातील (Pune) एका मित्राच्या फार्महाऊसवरून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर, दुसरा मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने शनिवारी रात्री उशिरा स्वतःहून पोलिसांना शरण आला. आज, रविवारी, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, बनकर कुटुंबीयांनी आपल्या मुलाला गोवण्यात आल्याचा आरोप केला असून, डॉ. मुंडे यांच्या हातावरील नावे दुसऱ्या कोणीतरी दबावाखाली लिहिली असावीत, असा संशय व्यक्त केला आहे.

News Title- Satara Doctor Suicide, Events Before Death

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now