‘…तोपर्यंत डॉक्टर संपदा मुंडे व्यवस्थित होत्या’; हॉटेल मालकाने दिली महत्त्वाची माहिती

On: October 29, 2025 4:27 PM
Dr. Sampada Munde
---Advertisement---

Sampada Munde Case | फलटण (Phaltan) येथील डॉक्टर संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांच्या आत्महत्येप्रकरणी आता हॉटेल मधुदीपमधील (Hotel Madhudeep) सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेलचे मालक दिलीप भोसले (Dilip Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेऊन हॉटेलला बदनाम केले जात असल्याचा दावा केला आहे. ही घटना आत्महत्याच असून, हत्या नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हॉटेल मालकाची पत्रकार परिषद

हॉटेल मधुदीपचे मालक दिलीप भोसले यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलेल्या हत्येच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. ही आत्महत्याच असून, आपल्या हॉटेलला आणि आपल्याला सामाजिक कार्यातील विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप भोसले यांनी केला. पोलिसांनी सुरुवातीला प्रतिसाद देण्यास उशीर केल्याने वकिलांच्या सल्ल्याने रूम उघडल्याचेही त्यांनी सांगितले.

भोसले यांनी घटनेचा क्रम स्पष्ट करताना सांगितले की, डॉ. मुंडे २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजता हॉटेलमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी दोन दिवसांसाठी खोली बुक केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी हॉटेलमध्ये फोन केला होता, तोपर्यंत त्या व्यवस्थित होत्या. मात्र, दुपारनंतर (संध्याकाळी ५ च्या सुमारास) खोलीतून प्रतिसाद न मिळाल्याने संशय आला आणि दार उघडले असता, त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. तात्काळ पोलिसांना कळवून तपासात पूर्ण सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले.

CCTV फुटेजमध्ये डॉक्टर एकट्याच? हॉटेलमध्ये येताना होत्या पॅनिक

पोलिसांना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. यात डॉ. संपदा मुंडे हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्यासोबत आणखी कोणी होते की त्या एकट्याच होत्या, हे फुटेजमधून अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, यावर तपास सुरू आहे. हॉटेलमध्ये चेक-इन करताना त्या खूप घाबरलेल्या (पॅनिक) अवस्थेत दिसत होत्या, असे निरीक्षण मालक भोसले यांनी नोंदवले.

त्यांना स्वतःची गाडीदेखील व्यवस्थित पार्क करता आली नाही, त्यामुळे हॉटेलच्या वॉचमनने त्यांची गाडी आत लावली, असेही भोसले यांनी सांगितले. आपण ३०-३५ वर्षे सामाजिक कार्यात असल्याने विरोधक आपल्याला जाणूनबुजून बदनाम करत आहेत, त्यामुळे ही हत्या नसून आत्महत्याच आहे, असा दावा त्यांनी पुन्हा केला.

Satara Doctor Suicide CCTV Emerges

Primary Keywords:

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now