मृत्यूपूर्वी डॉक्टर तरुणीचा ‘त्याला’ शेवटचा कॉल; साताऱ्यातील धक्कादायक कॉल डिटेल्सने खळबळ

On: October 25, 2025 4:02 PM
Satara Doctor Case News
---Advertisement---

Satara Doctor Death Case | सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरने आत्महत्या केली होती. तिने आत्महत्येपूर्वी तळहातावर लिहिलेल्या संदेशात एका पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचे आणि दुसऱ्या अधिकाऱ्यावर शारीरिक तसेच मानसिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.

महिला डॉक्टरकडून सहकार्य न केल्याची पोलिसांची तक्रार :

दरम्यान, या प्रकरणात साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी नवी आणि धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत डॉक्टर आणि आरोपी पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांच्यात अनेक वेळा फोन कॉल झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात वैशाली कडुकर यांनी सांगितले की, मृत डॉक्टर यांची पोलिसांविषयी काही तक्रार होती. त्याचबरोबर पोलिसांनीदेखील आरोपीच्या वैद्यकीय तपासणीवेळी डॉक्टरकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांच्या या तक्रारीच्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. तसेच, डॉक्टरने पूर्वी पोलिसांकडे सुरक्षा मागितल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Satara Doctor Death Case | शेवटचा कॉल आरोपी प्रशांत बनकरलाच? :

या आत्महत्येपूर्वी डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यातील शेवटचा संवाद झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक वेळा फोन कॉल आणि व्हॉट्सअप चॅटिंग झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या सर्व संभाषणाची चौकशी सध्या सुरू असून, यामधून नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी केलेली तक्रार ही प्रशासकीय प्रकारची असल्याचे कडुकर यांनी स्पष्ट केले. “पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी हे परस्पर सहकार्याने काम करतात. आरोपीची वैद्यकीय तपासणी दिवस असो वा रात्र, डॉक्टरने सहकार्य करणे आवश्यक असते,” असेही त्यांनी नमूद केले.

पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष

महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यासाठी हॉटेलचा मार्ग का अवलंबला, तिला खरंच असुरक्षित वाटत होतं का, आणि तिच्या मृत्यूपूर्वीच्या संवादांमधून काय नवे खुलासे समोर येतात — या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात दररोज नवे पुरावे समोर येत असल्याने साताऱ्यात आणि राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

News Title: Satara Doctor Death Case: Multiple Phone Calls Between Woman Doctor and Accused Officer Before Death, New Details Shock Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now