संतोष देशमुखांना ‘या’ व्यक्तींनी दिली होती जीवे मारण्याची धमकी!

On: January 13, 2025 12:42 PM
Santosh Deshmukh
---Advertisement---

Santosh Deshmukh l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र तरी देखील या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. तसेच या घटनेतील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे, मात्र मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर अद्यापही मोक्का लावण्यात आला नाही. त्यामुळे मस्साजोग गावचे ग्रामस्थ व धनंजय देशमुख हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. अशातच आता संतोष देशमुखांच्या पत्नीने एक धक्कादायक माहिती दिली आहे.

देशमुखांच्या पत्नीने दिली धक्कादायक माहिती :

दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या चौकशीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. अशातच आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी अश्विनी देशमुख यांच्या जबावातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांना हत्येच्या एका महिन्यापूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे संतोष देशमुख प्रचंड अस्वस्थ होते. तसेच त्यांना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

Santosh Deshmukh l वाल्मिक कराडवर मोक्का लावा :

मस्साजोग गावच्या ग्रामस्थांकडून वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आज या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. कारण मस्साजोग ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. तसेच या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले आहेत.

याशिवाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात आक्रोश मोर्चा काढण्यात आले. यावेळी या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणावरुन वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले जात आहेत. अशातच आता मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून आज 13 जानेवारीला टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

News Title : Santosh Deshmukh received a death threat a month ago

महत्वाच्या बातम्या –

आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरवात! जाणून घ्या शाही स्नानाच्या तिथी

सरपंच हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, केल्या ‘या’ मोठ्या मागण्या?

आज नवपंचम योगामुळे ‘या’ राशींचे लोक यशस्वी होणार!

सरपंच हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट, वाल्मिक कराडविरोधात मोठी कारवाई

कृषीमंत्री जवळचे सांगत शेतकऱ्यांची फसवणूक, वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघड

 

 

 

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now