सरपंच संतोष देशमुख यांचा हादरवून टाकणारा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर!

On: December 19, 2024 6:13 PM
Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन अत्यंत क्रूर पणे त्यांंची हत्या करण्यात आलीये. या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, हे प्रकरण आता आणखीच चिघळलं आहे. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी आता राजकीय नेते देखील आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

शवविच्छेदन अहवालात काय?

सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. देशमुख यांची हत्या केलेल्या आरोपीला 9 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, आता संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाल्याचं या शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. मारहाणीमुळे शरिरातून अतिरक्तस्त्राव झाला. शॉकमध्ये गेल्यामुळे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला, असा उल्लेख शवविच्छेदन अहवालात करण्यात आला आहे

चेहऱ्यावर मारहाण-

एवढंच नाही तर, संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, देशमुख यांची छाती, डोकं, हात-पाय, चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली आहे. चेहरा, डोळ्यांचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. संतोष देशमुख यांचा मृत्यू हॅमरेड अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिजमुळे झाला आहे.

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, नुकतेच बीड सरपंच हत्येप्रकरणी चौथा आरोपी विष्णु चाटेला ९ दिवसांनंतर अखेर अटक झाली आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तीन आरोपी फरार आहेत. हत्ये प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपीसह तीन जण फरार आहेत.

News Title : Santosh deshmukh postmortem report update

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ मंत्र्याच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

सासऱ्याने जावयावर केला अ‍ॅसिड हल्ला! कारण ठरलं हनीमूनचं…

… तर मग नव्या मंत्र्यांनी काय करायचं?; शिंदे गटाच्या आमदाराचा संतप्त सवाल

अमित शाहांच्या वक्तव्याने वाद, आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन

“वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये…”; आमदार क्षीरसागर कडाडले

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now