संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक, त्याचा नेमका रोल काय?

On: January 4, 2025 11:39 AM
Santosh Deshmukh Murder
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत महत्वाची घडामोड समोर आली आहे. कारण 31 डिसेंबर 2024 ला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. तसेच आता या हत्या प्रकरणातील दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. मात्र या घटनेतील कृष्णा आंधळे अजून फरार आहे. दरम्यान या दोन मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या आणि टीप देणाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील डॉक्टरला अटक :

सरपंच संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला देखील मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. कारण त्यावेळी या घटनेतील आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे यांना देखील अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना पळवून लावण्यात डॉ. संभाजी वायबसेची यांची महत्वाची भूमिका होती. कारण डॉ. संभाजी वायबसे यानेच आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच डॉ. वायबसेच्या कसून चौकशीनंतरच मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या दोन्ही आरोपींना बसवराज तेली यांच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आलं आहे.

Santosh Deshmukh Murder l पोलीस यंत्रणेवर दबाव :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर देखील मोठा दबाव आहे. तसेच वाल्मिक कराड हाच या प्रकरणात मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे.

कारण बीड जिल्ह्याच्या राजकारणात वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराडचा प्रभाव बीड जिल्ह्यावर असल्याच्या चर्चा होत आहे. कारण धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराडची ओळख असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यामुळेच चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

News Title – santosh deshmukh murder case sudarshan ghule sudhir sangle & doctor arrest

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुख हत्या प्रकरण…; अखेर सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळल्या?

‘त्या’ लाडक्या बहीणींचे पैसे पुन्हा सरकारजमा; कारण…

विष्णू चाटेनं अखेर तोंड उघडलं, वाल्मिक कराडबाबत दिली अत्यंत धक्कादायक कबुली

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर!

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?, परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now