सरपंच हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले संदर्भात मोठी अपडेट समोर!

On: January 1, 2025 12:31 PM
Sudarshan Ghule
---Advertisement---

Sudarshan Ghule l बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आतापर्यंत या हत्येप्रकरणात चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अशातच काल वाल्मिक कराड स्वतः पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. त्याला अटक केल्यानंतर रात्री उशीरा केज न्यायालयासमोर हजर केले आहे. मात्र आता या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर दोन फरार आरोपींचा CID शोध घेत आहे.

सीआयडी आरोपी सुदर्शनच्या मागावर :

संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार गेल्या 22 दिवसांपासून पसार आहेत. मात्र आता ते कुठे आहेत याचा कसून तपास करण्यात येत आहे. कारण या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याशिवाय आरोपी सुदर्शनने कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले. तसेच आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना कोणाला व्हिडिओ कॉल केला याची संपूर्ण माहिती समोर येईल. त्यामुळे सीआयडी आता आरोपी सुदर्शनच्या मागावर आहे.

Sudarshan Ghule l तीनही आरोपींच्या CID लवकरच मुसक्या आवळणार? :

दरम्यान, सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आला आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने पथकं त्यांचा शोध घेत आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीनही आरोपी फरार आहेत. कारण वाल्मीक कराडनंतर तपास यंत्रणांचा फोकस या तीन फरार आरोपींवर आहे. तसेच या खुनाच्या गुन्ह्यातील तीनही आरोपींच्या CID लवकरच मुसक्या आवळणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

News Title – Santosh Deshmukh Murder Case Sudarshan Ghule

महत्त्वाच्या बातम्या-

‘इथे सापडला की ठोकला’; वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर अजितदादांच्या नेत्याचं मोठं भाष्य!

“खालचा अधिकारी उचलून खंडणी…”; सुरेश धसांनी वाल्मिक कराडचे कारनामेच केले उघड

यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला? पाहा सर्व सणांच्या तारखा एका क्लिकवर

न्यू इयरला मिळाली आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now