बीडमध्ये घडामोडींना वेग! फरार आरोपींच्या तपासासाठी CID ने उचललं मोठं पाऊल

On: January 1, 2025 1:30 PM
Beed
---Advertisement---

Beed l बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आतापर्यंत या हत्येप्रकरणात चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अशातच काल वाल्मिक कराड स्वतः पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. त्यानंतर केजमधील कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

तिन्ही आरोपींच्या CID लवकरच मुसक्या आवळणार :

संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार गेल्या 22 दिवसांपासून पसार आहेत. मात्र सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आला आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने पथकं त्यांचा शोध घेत आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीनही आरोपी फरार आहेत. कारण वाल्मीक कराडनंतर तपास यंत्रणांचा फोकस या तीन फरार आरोपींवर आहे. तसेच या खुनाच्या गुन्ह्यातील तीनही आरोपींच्या CID लवकरच मुसक्या आवळणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

Beed l फरार आरोपींच्या कुटुंबियांची चौकशी सुरु? :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी सीआयडीच्या पथकाने केली आहे. तसेच बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावात आरोपी सुदर्शन घुलेचे घर आहे. मात्र या घटनेनंतर तीनही आरोपी फरार आहेत. त्यामुळे आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून आरोपीच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली जात झाल्याची माहिती मिळाली आहे.

याशिवाय हे तीनही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का? याचा देखील तपास सीआयडीकडून होत असल्याची माहिती मिळाली आहे. कारण वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर सीआयडीकडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील तीनही आरोपींचा शोध सुरु आहे.

News Title – Santosh Deshmukh Murder Case cid searching another accused

महत्त्वाच्या बातम्या-

सरपंच हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले संदर्भात मोठी अपडेट समोर!

‘इथे सापडला की ठोकला’; वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर अजितदादांच्या नेत्याचं मोठं भाष्य!

“खालचा अधिकारी उचलून खंडणी…”; सुरेश धसांनी वाल्मिक कराडचे कारनामेच केले उघड

यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला? पाहा सर्व सणांच्या तारखा एका क्लिकवर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now